सांगलीला अखेर पूरग्रस्त १३३ कोटींचा निधी मिळणार; शासन आदेश जारी

  सांगली : सांगली जिल्ह्यात जुलै महिन्यात आलेल्या महापुराने मोठे नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्ह्याला १३३ कोटी ७९ लाख ३७ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्य शासनाने याबाबतचे आदेश काढले आहेत. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) नुसार देय असलेल्या मदतीसह राज्य शासनाने वाढीव मदत दिल्याचेही या आदेशात म्हटले आहे.

  जुलै महिन्यात जिल्ह्यात अनेक भागात अतिवृष्टी झाली. यामुळे जिल्ह्यात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली. महापूराने जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले. पुराचे पाणी घरात शिरल्याने अनेकांचे संसार अक्षरशः पुराच्या पाण्यावरोवरच वाहून गेले. घरांची पडझड झाली. त्याचेही मोठे नुकसान झाले. मत्स्य व्यावसायिकांचे नूकसान झाले. यास दुकानदार, व्यापारी, व्यावसायिकांचा पुराचा मोठा फटका बसला.

  कारागीर, टपरी चालकांनाचे पुराने नुकसान केले. नुकसानग्रस्तांना वाढीव मदतीची घोषणा राज्य शासनाने केली होती. त्यानुसार त्याबाबतचा आदेश आज जारी करण्यात आला. राज्य शासनाने पूरग्रस्तांसाठी ५५४ कोटी ८७ लाख ५३ हजार रुपयांचा निधी आज मंजूर केला.

  जिल्ह्यात पुराने प्रचंड नुकसान झाले. मात्र, झालेल्या पंचनाम्यानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या तरतूदीनूसार देय असलेली १५ कोटी ५३ लाख ५२ हजार रुपये इतका निधी आणि राज्य शासनाने दिलेली ११८ कोटी २६ लाख ३७ हजार रुपये इतकी वाढीव निधी असा एकूण जिल्ह्याच्या वाट्याला १३३ कोटी ७९ लाख ८९ हजार रुपयांचा निधी आला आहे. हा निधी विभागीय आयुक्तांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ वितरीत केला जाणार आहे. निधीचे वाटप झाल्यानंतर लाभार्थी आणि वाटप निधीची यादी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

  अशी आहे मदत

  • घरातील प्रापंचिक साहित्य – ४७ कोटी ९४ लाख ५३ हजार
  • मृत जनावरे ३४ लाख ५१ हजार
  • घरांची पूर्ण / अंशत पडझड १८ कोटी १९ लाख ३१ हजार
  • मत्स्य व्यावसायिक १ कोटी ५२ लाख १६ हजार
  • हस्तकारागीर, बारा बुलतेदार – ३ कोटी ७० लाख ४ हजार
  • दुकानदार ५५ कोटी १९ लाख ७० हजार
  • शेत जमीन नुकसान – २ कोटी ३७ लाख मदत
  • छावणी ५० लाख ९७ हजार
  • सार्वजनिक क्षेत्रातील जमा झालेला कचरा व ढगारे उचलणे- ३ कोटी ४८ लाख ५२ हजार
  • कुक्कट पालन शेड ४ लाख ३१.