इस्लामपूर येथील मुक्तांगण प्ले स्कूलमध्ये अवतरले सांताक्लाॅज पाहून मुलं हरवून गेली.
इस्लामपूर येथील मुक्तांगण प्ले स्कूलमध्ये अवतरले सांताक्लाॅज पाहून मुलं हरवून गेली.

ख्रिश्चन धर्मियांचा प्रमुख सण असणारा नाताळ जगभरात खूप आनंद आणि उत्साहाने साजरा केला जातो. या सणाची ओळख व्हावी म्हणून उपक्रम राबविण्यात आला. लहान मुलांपासून थोरामोठ्यांना नाताळची उत्सुकता असते. नाताळ हा सण जगभरात खूप उत्साहाने साजरा केला जातो.

    इस्लामपूर : येथील मुक्तांगण प्ले स्कूलच्या आवारात नाताळ सणाच्या निमित्ताने अवतरले सांताक्लाॅज पाहून मुलं हरवून गेली. ख्रिसमस म्हणजेच नाताळ सणाबद्दल माहिती घेताना मुलांनी धम्माल केली.सांताक्लाॅजने मुलांना खाऊ दिला.येथील प्रशसकीय इमारतीच्या परीसरात ” मुक्तांगण ” मध्ये खेळांतून शिक्षण दिले जाते. विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून लहानपणा पासून मुलांचे व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी प्रत्यक्ष अनुभव दिले जातात.

    ख्रिश्चन धर्मियांचा प्रमुख सण असणारा नाताळ जगभरात खूप आनंद आणि उत्साहाने साजरा केला जातो. या सणाची ओळख व्हावी म्हणून उपक्रम राबविण्यात आला. लहान मुलांपासून थोरामोठ्यांना नाताळची उत्सुकता असते. नाताळ हा सण जगभरात खूप उत्साहाने साजरा केला जातो.

    नाताळ च्या दिवशी नाताळ वृक्ष म्हणजे ख्रिसमस ट्री उभारली जाते. ख्रिसमस ट्री हि सूचिपर्णी वृक्षापासून बनवली जाते. आणि तिला अतिशय सुंदर अशी सजावट केली जाते. याबाबत चित्रफिती दाखवून माहिती देण्यात आली. सांताक्लाॅजची वेशभूषा परिधान करून आलेल्या शिक्षकांनी आणि मुलांनी इतर मुलांना खाऊ वाटप केला. पांढरी शुभ्र दाढी, डोक्यावर टोपी घालून तांबड्या रंगाच्या कपड्यात आलेले
    सांताक्लाॅज आकर्षण ठरले.
    संचालिका सौ वर्षाराणी मोहिते म्हणाल्या,” भारतीय संस्कृतीची माहिती जाणून घेण्यासाठी लहान मुलांना उत्सुकता असते. आज सांताक्लाॅज शाळेत अवतरल्याने ख्रिसमसची गाणी ऐकत मुलांनी धम्माल केली.”