Sharad Pawar, don't lie too much ... Sadabhau will attack Pawar nrvk

"शरद पवार तुम्ही जास्त खोटे बोलू नका नाहीतर इतिहास लिहिला जाईल की, तुम्ही जाणते राजे नसून विश्वासघातकी राजे होऊन गेलात”, असं टीकास्त्र सदाभाऊ खोत यांनी यावेळी सोडले. शरद पवारांचे मनावर घेऊ नका. ते नेहमी उलटे बोलतात. जेव्हा ते बोलतात सूर्य इकडून उगवेल तेव्हा नेमका तो दुसऱ्या बाजूने उगवत असतो. शरद पवार यांनी आत्मचरित्रातही तसे लिहून ठेवले असल्याचे टीकाही त्यांनी केली. यानंतर पवारांचे आत्मचरित्र वाचावं की न वाचावं असा प्रश्न पडलाय असेही सदाभाऊ म्हणाले.

सांगली : ज्यावेळी महाराष्ट्राचा इतिहास लिहला जाईल त्यावेळी शरद पवारांच्याविषयी शेतकऱ्यांचा जाणता राजा नव्हे तर विश्वासघात करणारा राजा असं लिहलं जाईल असे म्हणत रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर घणाघाती टीका केली आहे.

“शरद पवार तुम्ही जास्त खोटे बोलू नका नाहीतर इतिहास लिहिला जाईल की, तुम्ही जाणते राजे नसून विश्वासघातकी राजे होऊन गेलात”, असं टीकास्त्र सदाभाऊ खोत यांनी यावेळी सोडले.

शरद पवारांचे मनावर घेऊ नका. ते नेहमी उलटे बोलतात. जेव्हा ते बोलतात सूर्य इकडून उगवेल तेव्हा नेमका तो दुसऱ्या बाजूने उगवत असतो. शरद पवार यांनी आत्मचरित्रातही तसे लिहून ठेवले असल्याचे टीकाही त्यांनी केली. यानंतर पवारांचे आत्मचरित्र वाचावं की न वाचावं असा प्रश्न पडलाय असेही सदाभाऊ म्हणाले.

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात मागील महिनाभरापासून दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या नव्या कृषी कायद्याविषयी सरकारची नेमकी भूमिका नागरिकांना समजवून सांगण्यासाठी भाजपच्या वतीनं देशभरात किसान आत्मनिर्भर यात्रा सुरु करण्यात आली आहे. सांगली येथे भाजपच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या किसान आत्मनिर्भर यात्रेत सदाभाऊ खोत बोलत होते.