तासगाव येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र, राज्य सरकारची मंजुरी

या उपकेंद्रामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध होईल. उपकेंद्र तातडीने सुरू करण्यासाठी शासनस्तरावर सर्व सहकार्य करण्यात येईल.

    सांगली : सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. हे उपकेंद्र सुरू करण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याच्या सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिल्या.

    मंत्रालयात बुधवारी आयोजित केलेल्या बैठकीत याबाबत निर्णय झाला. मंत्री सामंत म्हणाले, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांचे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे उपकेंद्र तासगाव येथे सुरू व्हावे असे अनेक दिवसांपासूनचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मला मिळाली ही समाधानकारक बाबा आहे. या उपकेंद्रामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध होईल. उपकेंद्र तातडीने सुरू करण्यासाठी शासनस्तरावर सर्व सहकार्य करण्यात येईल.

    शिवाजी विद्यापीठ तासगाव येथे होत असल्यामुळे विद्यार्थ्यांचिंता सोय होणार आहे. आबांचे एक स्वप्न या निर्णयाने पूर्ण झाले आहे. जत पासून माण-खटाव पर्यंत विद्यार्थ्यांना जवळपास समस्या सुटणार आहेत.

    - रोहित आर.आर.पाटील