धक्कादायक ! ‘मोदी’ चोरीला , अलिशान कारमधून पळविल्याने खळबळ

सांगली : सोलापुरातल्या सांगोल्याच्या बाबूराव मेटकरींच्या मोदी बोकडाची राज्यभर चर्चा झाली. या बोकडावर आटपाडीच्या बाजारात तब्बल ७० लाखांची बोली लागली होती. मात्र मेटकरींना तो दीड कोटींच्या खाली विकायचा नव्हता. त्यामुळं हा व्यवहार होऊ शकला नाही. याच बाजारात त्यांनी मोदी बोकडाचं बीज असलेल्या दुसऱ्या बोकडालाही आणलं होतं, हा बोकड त्यांनी १६ लाखांना विकला.

सांगली : सोलापुरातल्या सांगोल्याच्या बाबूराव मेटकरींच्या मोदी बोकडाची राज्यभर चर्चा झाली. या बोकडावर आटपाडीच्या बाजारात तब्बल ७० लाखांची बोली लागली होती. मात्र मेटकरींना तो दीड कोटींच्या खाली विकायचा नव्हता. त्यामुळं हा व्यवहार होऊ शकला नाही. याच बाजारात त्यांनी मोदी बोकडाचं बीज असलेल्या दुसऱ्या बोकडालाही आणलं होतं, हा बोकड त्यांनी १६ लाखांना विकला. जो आटपाडीच्या सोमनाथ जाधव यांनी विकत घेतला.आता हाच बोकड चोरी गेला आहे. शनिवारी पहाटे चोरांनी गोठ्यात शिरुन त्याला पळवलं. विशेष म्हणजे एका आलिशान चारचाकी गाडीतून हा बोकड लंपास करण्यात आल्याने खळबळ माजली आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात आटपाडी कार्तिक पौर्णिमेची यात्रा प्रसिद्ध आहे. येथे पशुपालक , मेंढपाळ मोठ्या संख्येने येत असतात. चालू वर्षी कोरोनामुळे यात्रा रद्द झाली. त्याऐवजी फक्त जनावरांचा बाजार रविवारी आणि सोमवारी भरविण्यात येतो. गेल्या महिन्यात मोठ्या उत्साहात हौशी मेंढपाळ पशूपालक यांनी आपल्या जनावरांसह हजेरी लावली होती. तिथंच हे दोन्ही बोकड पाहायला मिळाले होते.बोकडासाठी १६ लाखांची किंमत खूप जास्त आहे. मात्र, जाधवांनी मोठ्या हौशीनं हा बोकड घेतला. मात्र, त्याच्यावर चोरट्यांची वाईट नजर पडली.या बोकडाचा तपास पोलीस करणारा करणार आहेत. दरम्यान बोकड शोधून देणाऱ्यांसाठी जाधव यांनी बक्षीसही ठेवल्याची माहिती आहे.