सोनाली नवांगुळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार

साहित्य अकादमीचे भाषांतरासाठीचे सन २०२०चे पुरस्कार आकादमीच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर कबर यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आले. यात देशभरातील २४ पुस्तकांना पुरस्कार जाहीर करण्यात आले. नवांगुळ यांनी तमिळ भाषेतील 'इंद्रम जम्मकलीन कथई' या कादंबरीचा 'मध्यरात्रीनंतरचे तास' या नावाने अनुवाद केला आहे.

    सांगली : सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील साहित्यिका सोनाली नवांगुळ यांना भाषांतरासाठीचा साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. नवांगुळ यांनी अनुवादित केलेल्या ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या पुस्तकासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. ५० हजार रुपये रोख आणि म नपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. साहित्य अकादमीचे भाषांतरासाठीचे सन २०२०चे पुरस्कार आकादमीच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर कबर यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आले. यात देशभरातील २४ पुस्तकांना पुरस्कार जाहीर करण्यात आले.

    नवांगुळ यांनी तमिळ भाषेतील ‘इंद्रम जम्मकलीन कथई’ या कादंबरीचा ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या नावाने अनुवाद केला आहे. त्यांच्या अनुवादित पुस्तकांमध्ये त्यांच्या ‘मध्यरात्रीनंतरचे तास’, ‘ड्रीमरनर’, ‘वरदान रागाचे’, ‘वारसा प्रेमा’चा ही चार पुस्तके आहेत. याशिवाय ‘स्वच्छंद’ हे ललित लेखन, ‘जॉयस्टिक’ हा कथासंग्रह आणि ‘मेधा पाटकर’ या मुलांसाठीचा माहितीपर पुस्तकांचा समवेश आहे. सांगली जिल्ह्यात नवनाथ गोरे (फेसाटी) यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता.

    साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहे. हा अनुवादाचा पुरस्कार आहे. भाषेवर ज्याचे प्रेम आहे त्यांना अनुवाद करण्यातून आपली भाषा जास्त सापडते, सलमा नावाच्या लेखिकेची ही तमिळ कादंबरी आहे. कविता महाजन यांच्या प्रेरणातून याचा अनुवाद करण्याची संधी मिळाली. साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्याचा आनंद होत आहे.

    - सोनाली नवांगुळ