…अन् तासगाव आगारातून अखेर धावली ‘लालपरी’

तासगाव आगारातून शिवसेना तासगावच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांची समजूत काढली व तासगाव सांगली, तासगाव मिरज, तासगाव विटा या मार्गावर नारळ फोडून एसटी सुरू (ST Bus Started Again) केली. 

    तासगाव : तासगाव आगारातून शिवसेना तासगावच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांची समजूत काढली व तासगाव सांगली, तासगाव मिरज, तासगाव विटा या मार्गावर नारळ फोडून एसटी सुरू (ST Bus Started Again) केली.
    शिवसेना संपर्कप्रमुख नितीन बानगुडे पाटील व जिल्हाप्रमुख संजय विभुते यांच्या सूचनेनुसार शिवसेनेचे शिष्टमंडळ सकाळी आंदोलनस्थळी पोहोचले. सर्व पदाधिकाऱ्यांनी आंदोलनादरम्यान आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीय या प्रति सहानुभूती व्यक्त केली व एसटी कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. या कर्मचारी संपादरम्यान काही राजकीय पुढारी जाणीवपूर्वक राजकीय भांडवल करून दुकानदारी करीत आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांची दिशाभूल होत असून, कर्माचार्‍यांनी आडमुठे पणाची भूमिका न घेता कामावर हजर व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
    यावेळी शिवसेना शेतकरी प्रतिनिधी संदीप गिड्डे पाटील, तालुकाप्रमुख प्रदीप पाटील, तालुका संघटक जयवंत माळी, महिला आघाडी विधानसभा प्रमुख शोभाताई पिसाळ, युवासेना तालुकाप्रमुख नितीन राजमाने, महिला आघाडी तालुकाप्रमुख मनिषाताई पाटोळे, शहरप्रमुख विशाल शिंदे, युवासेना उपतालुकाप्रमुख अनिल दौंड यांच्यासह पोलिस निरीक्षक संजीव झाडे, पोलिस उपनिरीक्षक नामदेव तरटे व एसटी चालक-वाहक उपस्थित होते.