प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

खा. संजयकाका पाटील यांच्या तासगाव येथील जनसंपर्क कार्यालयासमोर तीन दिवस ठिय्या आंदोलन करण्यात आले होते.यामध्ये पहिल्या दिवशी मोर्चा काढला होता. तर,दुसऱ्या दिवशी भीक मांगो आंदोलन करण्यात आले होते.तिसऱ्या दिवशी मुंडण आंदोलन करण्यात आले.यावेळी महिलांनीही मुंडण केले होते. थकीत ऊसबिलासाठी महिलांनी मुंडण करणे ही राज्यातील पहिली घटना ठरली होती.

    तासगाव : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रेटयापुढे साखर सम्राटांना अखेर गुडघे टेकावे लागले आहेत .तासगाव आणि नागेवाडी कारखाण्याच्या थकीत ऊस बिलासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. मागे दिलेले ७ कोटींचे धनादेश वटले आहेत.शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे वर्ग झाले तर आंदोलनाच्या रेट्यामुळे आता पर्यंत २० कोटी रुपयांची ची बिले शेतकऱ्यांना मिळाली आहेत. अशी माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली .

    खराडे म्हणाले, तासगाव आणि नागेवाडी कारखान्याची ऊस बिले गेल्या सात ते आठ महिन्यांपासून थकीत आहेत. ती बिले मिळावीत यासाठी पहिल्यांदा एप्रिल महिन्यात आंदोलन करण्यात आले.त्यावेळी खा. संजयकाका पाटील यांनी एका महिन्यात बिले देतो असे सांगितले होते.मात्र बिले दिली नाहीत म्हणून पुन्हा ७ जून आणि २०जून रोजी तासगाव येथे खा संजयकाका पाटील यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले होते.त्यावेळीही त्यांनी आश्वासन दिले, पण तेही त्यांनी पाळले नाही.

    त्यामुळे पुन्हा खा. संजयकाका पाटील यांच्या तासगाव येथील जनसंपर्क कार्यालयासमोर तीन दिवस ठिय्या आंदोलन करण्यात आले होते.यामध्ये पहिल्या दिवशी मोर्चा काढला होता. तर,दुसऱ्या दिवशी भीक मांगो आंदोलन करण्यात आले होते.तिसऱ्या दिवशी मुंडण आंदोलन करण्यात आले.यावेळी महिलांनीही मुंडण केले होते. थकीत ऊसबिलासाठी महिलांनी मुंडण करणे ही राज्यातील पहिली घटना ठरली होती.

    त्यावेळी खासदारांनी सर्वांना चेक देतो असे सांगितले होते.यावेळी दहा प्रतीकात्मक चेक ही दिले गेले.पण त्यातही पुन्हा शेतकऱ्यांना फसवले गेले.त्यामुळे पुन्हा १७ ऑगस्ट रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला. यावेळी त्यांनी सात कोटींचे धनादेश ११ सप्टेंबर रोजी चे दिले होते.ते सर्व धनादेश आज मंगळवारी वटले आहेत. शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे वर्ग झाले आहेत.

    उर्वरित शेतकऱ्यांचेही लवकरात -लवकर पैसे मिळतील.आता पर्यंत शेतकऱ्याची २० ते २२ कोटीची ऊस बिले शेतकऱ्यांना मिळाली आहेत. अद्यापही काही शेतकऱ्यांना ऊस बिले मिळायची आहेत त्यामुळे त्याचीही बिले तातडीने द्यावीत जेणे करून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. असे उद्गार जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी काढले.