विट्यात सडलेला अवस्थेत आढळला ४० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह

शहरातील घुमटमाळ येथे पेंटींगचा व्यवसाय करणाऱ्या अशोक पोपट कदम (वय ४०, रा. हिंगणगांव ता. कडेगांव) या तरूणाचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला. या तरूणाचा घातपात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    विटा / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : शहरातील घुमटमाळ येथे पेंटींगचा व्यवसाय करणाऱ्या अशोक पोपट कदम (वय ४०, रा. हिंगणगांव ता. कडेगांव) या तरूणाचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला. या तरूणाचा घातपात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    याबाबत विटा पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. अशोक हा पेंटींगचा व्यवसाय करीत होता. हिंगणगावातून विट्याला कामानिमित्त आल्यानंतर अशोक हा आठ-आठ दिवस परत घरी जात नव्हता. मात्र, गुरूवारी सकाळी त्याचा मृतदेह विटा-पारे रस्त्यावरील विहिरीजवळ सडलेल्या अवस्थेत सापडल्यानंतर विटा शहरात खळबळ उडाली.

    दरम्यान, अशोक यांच्याबाबत घातपात झाला असण्याची शक्यता वर्तवली जात असून, पोलिसांनी त्या दृष्टीने तपासाची चक्रे गतीने फिरविण्यास सुरूवात केली आहे.