महाराष्ट्रातील पहिला सिलिकॉन पुतळा सांगलीतील कवठेपिरान गावात

    सांगली : कवठेपिरान (मिरज) येथील दिवंगत राज्य उत्पादन शुल्क विभागात रावसाहेब कोरे यांचा महाराष्ट्रातील पहिला सिलिकॉन पुतळा (Silicone Statue) उभारण्यात आला आहे. त्यांचा मुलगा अरुण कोरे यांनी त्यांच्या स्मृती जपण्यासाठी हा अनोखा उपक्रम केला आहे.

    कोरे यांनी आपल्या कार्य कौशल्याचा ठसा उमटवला होता. त्याच्या कामगिरीमुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले होते, गतवर्षी नागपूर विभागात कार्यरत असताना त्यांचे निधन होते. अवैध दारू विक्रेत्यांना त्यांनी जरब बसवली होती. पाटबंधारे विभागातून त्यांनी शासकीय सेवेची सुरवात केली. नंतर ते राज्य उत्पादन शुल्क विभागात रुजू झाले. या विभागात त्यांनी कार्य कौशल्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली. कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी राज्यभर कोळी बांधवांना संघटीत केले होते.

    २४ सप्टेंबर रोजी त्यांचे प्रथम पुण्यस्मरण आहे. त्या निम्मिताने रावसाहेब कोरे यांच्या सिलिकॉनच्या पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे. सिलिकॉनचा हा पुतळा महाराष्ट्रातील पहिलाच आहे, हा पुतळा म्हणजे जणू ती व्यक्ती साक्षात समोर बसल्याचा आभास देते. त्याचदिवशी वृक्षारोपण, ग्रंथ प्रकाशन व विविध विकासकामांचे उदघाट्न केले जाणार आहे .