आंतरराज्यीय चोरट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या ; इस्लामपूर पोलिसांचे यश, टोळीतील दोघांना अटक

इटकरे ता. वाळवा येथील तुलसीदास दादू कांबळे हे दि. १३ सप्टेंबर रोजी मुलीसह सकाळी सव्वा अकरा वाजता इस्लामपूर येथील युनियन बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते. बँकेतून ६० हजार रूपये काढल्यानंतर ते गाडी जवळ आले. तेथे आल्यानंतर मुलीच्या मानेला खाज येवू लागल्याने तीने पैशाची पिशवी गाडीजवळ ठेवली.

    वाळवा : वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथील युनियन बँक परिसरातून वृध्दाची ६० हजार रूपयांची रोकड लंपास करणा-या आंतरराज्य टोळीतील दोघांना इस्लामपूर पोलिसांनी अटक केली आहे. अजय बाबु जाधव वय २१ व चंद्रु रामु भोई वय ३० दोघे रां. अंबरनाथ जि.ठाणे अशी संशयीत आरोपींची नावे आहेत.

    इटकरे ता. वाळवा येथील तुलसीदास दादू कांबळे हे दि. १३ सप्टेंबर रोजी मुलीसह सकाळी सव्वा अकरा वाजता इस्लामपूर येथील युनियन बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते. बँकेतून ६० हजार रूपये काढल्यानंतर ते गाडी जवळ आले. तेथे आल्यानंतर मुलीच्या मानेला खाज येवू लागल्याने तीने पैशाची पिशवी गाडीजवळ ठेवली. यावेळी पाठीमागून मोटरसायकलवरून आलेल्या इसमाने मानेला पाणी लावा असे सांगत पैसे ठेवलेली पिशवी पळवली. यानंतर कांबळे यांनी इस्लामपुर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

    दरम्यान, पोलिस उपविभागीय अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली या चोरीचा तपास सुरू झाला. शहरातील विविध भागात असलेले सिसिटीव्ही तपासण्यात आले. या सिसिटीव्ही मध्ये चोरांची छबी दिसून आली. यानंतर पोलिसांनी एका आठवड्यात या चोरट्यांना अटक केली.