“काका, मी नारळ फोडू का?” म्हणणाऱ्या बालकाची इच्छा राज्याच्या जलसंपदा मंत्र्यांनी पूर्ण केली

येडेनिपाणी ते बावची रस्ता, आष्टा-दुधगाव रस्ता, बागणी-ढवळी-बहादूरवाडी रस्ता, ढवळी ते कोरेगांव दरम्यान दोन लहान पुल नागाव-भडखंबे-बहादूरवाडी फाटा रस्ता या विकासकामांच्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी १६.६५ कोटी इतका निधी उपलब्ध करून दिला आहे.

    वाळवा : राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil Maharashtra Cabinet Minister of the Water Resources Department)यांच्या हस्ते वाळवा तालुक्यातील भडकंबे गावात विविध कामांचा शुभारंभ कार्यक्रम सुरू असताना सहा वर्षीय संचित गावडे तिथे उपस्थित होता. आपल्या गावातील मोठी मंडळी नारळ फोडतानाचे चित्र पाहून संचितलाही याचं कुतूहल वाटलं. मोठी हिंमत करुन संचितने जयंत पाटील यांच्याकडे नारळ फोडण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर जयंत पाटील यांनीही त्याला नारळ फोडून देत त्या चिमुकल्याची इच्छा पूर्ण केली. मंत्री जयंत पाटील यांच्या या कृतीने भडकंबे गावातील गावकरी भारावले.

    जयंत पाटील म्हणाले, कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या या माझ्या लहान मित्राने धीटपणे विचारले, “काका, मी नारळ फोडू का?” मी अर्थातच ‘हो‘ असे उत्तर दिले. या कामासाठी एकूण १७.६५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या रस्ते आणि पूल निर्मितीमुळे नागरिकांसाठी दळणवळण सुलभ होणार आहे.

    १६.६५ कोटींची विकासकामे