…तर महाविकास आघाडी सरकार बरखास्त होईल : सदाभाऊ खोत

लोकशाहीत कोणाला कुठेही जाण्याचा अधिकार आहे, ते महालक्ष्मीच्या दर्शनाला जात होते, कोण कधीही काहीही पाहू शकतो. दादागिरीचे उत्तर दादागिरीनेच दिले जाईल.

    सांगली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : गेल्या चार दिवसांपासून भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiyya) कोल्हापूराला येत असताना त्यांना रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील गावगुंड त्यांना खुली धमकी देत आहेत, याला महाविकास आघाडीकडून पाठिंबा दिला जातो, अशा प्रकारातून सोमय्या यांच्या केसाला जरी धक्का लागला तर त्याच क्षणी महाविकास आघाडी सरकार बरखास्त होईल, असा इशारा माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी दिला.

    सदाभाऊ खोत म्हणाले, लोकशाहीत कोणाला कुठेही जाण्याचा अधिकार आहे, ते महालक्ष्मीच्या दर्शनाला जात होते, कोण कधीही काहीही पाहू शकतो. दादागिरीचे उत्तर दादागिरीनेच दिले जाईल. त्यामुळे महाविकास आघाडीने सोमय्या यांच्या पाठीशी जनता असल्याचे लक्षात घ्यावे, असेही ते म्हणाले.