Unnatural rape of a youth by the Sangli police

  सांगली : इस्लामपूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी  हणमंत कृष्णा देवकर (वय ३४) यांच्या कॉलेजच्या मुलावर अनैसर्गिक बलात्कार व खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस दलात खळबळ माजली आहे(Unnatural rape of a youth by the Sangli police).याबाबत इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी दिली.

  इस्लामपूर पोलीस ठाणेस नेमुणकीस असलेला पोलीस कर्मचारी देवकर व त्याच्या बरोबर असलेले २७ ऑक्टोबरला पहाटे ०३.०० वाजता पेट्रोलिंग करीत असताना पिडीत मुलगा हा त्याची मैत्रिण हिस भेटून पुन्हा त्याचे वस्तीगृहात जात असताना आरोपी हणमंत देवकर व एक पोलीस कर्मचारी यांनी त्यास अडवून त्यास “ आत्ता कोठून आलास इथे काय करतो ” असे विचारले असता पिडीत याने मैत्रिणीला भेटून आलो आहे असे सांगितले. त्यावेळी आरोपी हणमंत देवकर याने पिडीतास संपूर्ण माहीती मागितली असता पिडीताने सर्व माहीती सांगितलंवर त्याचा मोबाईल नंबर दिला.

  २९ ऑक्टोबर रोजी पिडीत यांस आरोपी हणमंत देवकर याने मोबाईलवरून फोन करून “ कॉलेजच्या गेटवर भेटायला ये ” असे सांगितले . त्यानंतर ११.१५ वा पिढीत हा आरोपी हणमंत देवकर यास भेटायला गेलेवर त्यास त्याचे मैत्रिणीचे प्रेमप्रकरणावरून धमकावून पैशाची मागणी करून त्याचे घरी व मैत्रिणीचे घरी सांगणेबाबत धमकावले . त्यावेळी त्याने घाबरून त्याचे कॉलेजमधील मित्रांचेकडून ४००० रुपये उसणे घेवून पोलीस हणमंत देवकर यास दिले. परंतु त्याचे समाधान झाले नाही .

  आरोपी हणमंत देवकर याने पिडीतास “ तुझ्या मैत्रिणीचा नंबर मला दे , व तिला माझ्यासोबत सेक्स करायला सांग असे सांगितले. त्यावेळी पिडीताने ती मुलगी चांगली आहे व तसे करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यावेळी आरोपी हणमत देवकर याने पिडीतास “ तु मला तुझ्या मैत्रिणीसोबत जर सेक्स करायला देत नसशील तर मी तुझ्या सोबत सेक्स करणार ” असे म्हणाला. त्यावर पिडीत मुलगा घाबरला . आरोपी हणमंत देवकर याने पिडीतास तुझ्या रूमवर चल मला तुझ्यासोबत सेक्स करायाचा आहे असे सांगितले. नंतर त्याने पिडीताने आपल्या मित्रास दुसऱ्या रूममध्ये जाणेस सांगितले आरोपी हणमंत देवकर व पिडीत मुलगा असे पिडीत मुलाचे रूममध्ये गेले.

  तेथे आरोपी हणमंत देवकर याने पिडीत याचेबरोबर अनैसर्गिक संभोग केला व त्यांचेत झालेला अनैसर्गिक संभोगाचा व्हिडीओ आरोपी हणमंत देवकर याने केला व तेथून निघून गेला. २१ ऑक्टोबरला दुपारी १२.३० वा . चे सुमारास आरोपी हणमंत देवकर याने पुन्हा पिडीत मुलास त्याचे मोबाईलवरती फोन करून कॉलेजच्या गेटवर बोलावून संभोगाची मागणी केली . व त्याचे मोबाईलमधील त्यांचेतील अनैसर्गिक संभोगाचा व्हिडीओ दाखविला व “ तु आज माझ्यासोबत आला नाहीस तर तुला आता दाखविलेला व्हिडीओ मी व्हायरल करीन ” अशी धमकी दिली व निघून गेला.

  सदर घडलेल्या प्रकाराबाबत पिडीताने त्याचे मित्रास सांगून त्यानंतर पोलीस ठाणेत येवून इस्लामपूर पोलीस ठाणे गु.र.नं. ७७ ९ / २०२१ भा.दं.सं. क- ३८४,३७७ , ५०४ , ५०६ माहीती तंत्रज्ञान अधिनियम कलम – ६७ प्रमाणे दिनांक २१ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हयातील आरोपी पोलीस कॉन्स्टेबल हणमंत देवकर यास अटक करण्यात आली आहे.

  सदर गुन्हयाचा तपास पो.नि. शशिकांत चव्हाण , इस्लामपूर पोलीस ठाणे हे करीत आहेत . सदर गुन्हयातील आरोपी पोलीस कॉन्स्टेबल हणमंत देवकरने  इस्लामपूर पोलीस ठाणे याचेविरुध्द मा . पोलीस अधीक्षक , सांगली यांना खात्यांतर्गत कडक कारवाई होणेबाबत तात्काळ अहवाल पाठविला जाणार आहे.