सांगली जिल्ह्यातील तीन नगरपंचातीसाठी मतदानाला सूरुवात, मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला

कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणूकी मध्ये राष्ट्रवादी विरुद्ध सर्व पक्ष आघाडी अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांच्या पॅनल विरोधात भाजपा खासदार संजयकाका पाटील, माजी मंत्री आणि शिवसेना नेते अजितराव घोरपडे,राष्ट्रवादीच्या नेत्या अनिता सगरे आणि काँग्रेसचे स्थानिक नेत्यांच पॅनल यांच्यात निवडणूक होत आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिले आहे.

    सांगली जिल्ह्यातील 3 नगरपंचातीसाठी आज मतदानाला सूरुवात झाली आहे. सकाळच्या सत्रात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. मतदान केंद्रा बाहेर मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. कवठेमहांकाळ, खानापुर आणि कडेगाव या नगरपंचायतीची निवडणूक होत असून, प्रत्येकी 13 जागांसाठी 125 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. तर 40 मतदान केंद्रावर 23 हजार मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणूकित दिगग्ज नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.
    कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणूकी मध्ये राष्ट्रवादी विरुद्ध सर्व पक्ष आघाडी अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांच्या पॅनल विरोधात भाजपा खासदार संजयकाका पाटील, माजी मंत्री आणि शिवसेना नेते अजितराव घोरपडे,राष्ट्रवादीच्या नेत्या अनिता सगरे आणि काँग्रेसचे स्थानिक नेत्यांच पॅनल यांच्यात निवडणूक होत आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिले आहे.
    कडेगाव नगरपंचायत मध्ये सध्या काँग्रेसची सत्ता आहे. या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा आणि इतर स्थानिक आघाड्या अश्या बहुरंगी लढत असून कृषी राज्यमंत्री विश्‍वजित कदम, भाजपचे नेते माजी आमदार पृथ्वीराज देशमुख,संग्रमसिंह देशमुख आणि राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
    तर, खानापूर नगरपंचायत मध्ये सध्या काँग्रेस आणि शिवसेना आघाडीची सत्ता असून याठिकाणी काँग्रेस, शिवसेना आघाडी विरुद्ध भाजपा आणि राष्ट्रवादी आणि स्थानिक आघाडी अशी तिरंगी लढत होत आहे. या ठिकाणी शिवसेनेचे आमदार अनिल बाबर आणि भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर व स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.