भाजपाचा धुव्वा! सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे वर्चस्व; पण जुनी मैत्री काँग्रेसला भारी पडली

सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनेलने भाजपाला घरचा रस्ता दाखवला आहे. 21 पैकी केवळ 4 जागांवरत भाजपाला विजय मिळाला. त्यामुळे बँकेतील सत्तेतून भाजपाला बाहेर पडावे लागले आहे. मतदारांची पळवापळवी आणि चुरशीने प्रचार झाल्यानंतर 18 जागांसाठी रविवारी मतदान झाले होते. सोमवारी सकाळपासून सुरू झालेल्या मतमोजणीत महाविकास आघाडीच्या पॅनेलने भाजपला धोबीपछाड दिले. या निवडणुकीत आघाडीने 17 जागांवर विजय मिळविला आहे(Mahavikas Aghadi dominates Sangli District Central Bank elections ).

    सांगली : सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनेलने भाजपाला घरचा रस्ता दाखवला आहे. 21 पैकी केवळ 4 जागांवरत भाजपाला विजय मिळाला. त्यामुळे बँकेतील सत्तेतून भाजपाला बाहेर पडावे लागले आहे. मतदारांची पळवापळवी आणि चुरशीने प्रचार झाल्यानंतर 18 जागांसाठी रविवारी मतदान झाले होते. सोमवारी सकाळपासून सुरू झालेल्या मतमोजणीत महाविकास आघाडीच्या पॅनेलने भाजपला धोबीपछाड दिले. या निवडणुकीत आघाडीने 17 जागांवर विजय मिळविला आहे(Mahavikas Aghadi dominates Sangli District Central Bank elections ).

    जुनी मैत्री काँग्रेसला भारी

    विकास सोसायटी गटात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सहकार विकास पॅनेलने सातपैकी सहा जागा जिंकत हुकुमत राखली, मात्र जतमध्ये काँग्रेसचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. तेथे भाजप आणि राष्ट्रवादीची जुनी मैत्री काँग्रेसला भारी ठरली आहे.एकूण संख्याबळात राष्ट्रवादीला सर्वाधिक 9 , काँग्रेस 5 , भाजपा 4, शिवसेना 3 असा निकाल लागला.

    जयंत पाटलांनाही धक्का

    या निवडणुकीत भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल महाडिक यांनी बँका-पतसंस्था गटातून चांगल्या मताधिक्याने विजय मिळवला. या विजयामुळे जयंत पाटील यांना धक्का बसला आहे.