अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी जिल्हा बँकेच्या अकरा जागा बिनविरोध

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत (Satara District Bank Election) अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी ११ जागा बिनविरोध झाल्या. यामध्ये विद्यमान अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले, खासदार उदयनराजे भाेसले, विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचा समावेश आहे.

  सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत (Satara District Bank Election) अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी ११ जागा बिनविरोध झाल्या. यामध्ये विद्यमान अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले, खासदार उदयनराजे भाेसले, विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचा समावेश आहे. आमदार मकरंद पाटील, शिवरूपराजे खर्डेकर, राजेंद्र राजपुरे यापूर्वीच बिनविराेध निवडून आले आहेत.

  बिनविरोध निवडून आलेले संचालक

  खरेदी विक्री – आमदार मकरंद पाटील
  कृषी प्रक्रिया –  शिवरूपराजे खर्डेकर
  गृहनिर्माण – खासदार  उदयनराजे भोसले
  भटक्या विमुक्त जमाती – लहू जाधव
  अनुसूचित जाती जमाती – सुरेश सावंत
  औद्योगिक व विणकर – अनिल देसाई बिनविरोध

  प्राथमिक कृषी पतपुरवठा गट मतदारसंघ
  सातारा – आमदार शिवेंद्रराजे भोसले
  फलटण – रामराजे नाईक-निंबाळकर
  खंडाळा – दत्तानाना ढमाळ
  वाई – नितीन पाटील
  महाबळेश्वर – राजेंद्र राजपुरे.