लोणंद नगरपंचायतीसाठी १६३ उमेदवारी अर्ज दाखल ; तेरा प्रभागात होणार निवडणूका, एक, दोन, अकरा, सोळा प्रभागाच्या निवडणुकीला स्थगिती

राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, कॉग्रेस हे सर्वच पक्ष स्वबळावरही निवडणुक लढण्याचे चित्र दिसत आहे. प्रत्येक पक्षाने आपली मोर्चेबांधणी सुरू केली असून आपला ऊमेदवार निवडुन आणायचाच असा ठाम निर्णय घेतला आहे.

  लोणंद : लोणंद नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७ डिसें२०२१ ही अंतिम तारीख होती. या शेवटच्या दिवशी १७ जागांसाठी एकूण १६३ अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप मुख्याधिकारी हेमंत ढोकले यांनी दिली .

  राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, कॉग्रेस हे सर्वच पक्ष स्वबळावरही निवडणुक लढण्याचे चित्र दिसत आहे. प्रत्येक पक्षाने आपली मोर्चेबांधणी सुरू केली असून आपला ऊमेदवार निवडुन आणायचाच असा ठाम निर्णय घेतला आहे. ऊमेदवार निवडताना प्रत्येक पक्षाची दमछाक झालेली यावेळी दिसून आली. ऊमेदवारी मिळवणेसाठी अनेकांनी यावेळी गुडघ्याला बाशिंग बांधले होते. मात्र काहींना या वेळी पक्षश्रेष्ठींनी डावलल्याने शांत बसावे लागले आहे.

  लोणंद नगरपंचायत प्रभाग क्र. १, २, ११, १६, या चार प्रभागातील निवडणुकीला न्यायालयाच्या ओबीसी आरक्षणामुळे स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे या प्रभागातील इच्छुकांच्या ऊत्साहावर न्यायालयाच्या निर्णयामुळे पाणी फिरले आहे. या चार प्रभागाच्या निवडणुका २१ तारखेला होणार कि नाही ? न्यायालयाचा निकाल लवकर लागेल का ? निकाल लागला नाही तर निवडणुका कधी होणार ? याकडे सर्वांच्या नजरा लागुण राहील्या आहेत.

  निवडणुकीसाठी पहील्या पाचही दिवसात एकही अर्ज भरला गेला नव्हता. दि. ६ डिसें. या सहाव्या दिवशी लोणंद नगरपंचायतीसाठी १७ जागासाठी ३२ अर्ज दाखल झाले होते. मात्र दि. ७ डिसेंबर हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने या दिवशी १३१ अर्ज दाखल झाले. सर्व पक्षाने आपआपले पत्ते प्रभागानिहाय ऊमेदवारांचे ऊशिरा खुले केलेने या शेवटच्या दिवशी असंख्य गर्दी अर्ज भरणेसाठी ऊमेदवारांनी केली होती. अर्ज भरणेसाठी प्रत्येक ऊमेदवाराबरोबर अनेक कार्यकर्ते आलेने नगरपंचायत परिसरात सर्वत्र नागरिकांची असंख्य गर्दी झालेने यात्रेचे स्वरूप आले होते.

  प्रभागनिहाय अर्ज
  प्रभाग क्र. १ – १० अर्ज
  प्रभाग क्र. २ – ०४ अर्ज
  प्रभाग क्र. 3- ११ अर्ज
  प्रभाग क्र. ४ -११ अर्ज
  प्रभाग क्र. ५ – १० अर्ज
  प्रभाग क्र. ६ -०७ अर्ज
  प्रभाग क्र. ७ – १४ अर्ज
  प्रभाग क्र. ८ – ४ अर्ज
  प्रभाग क्र. ९ – १९ अर्ज
  प्रभाग क्र. १० – १० अर्ज
  प्रभाग क्र. ११ – ०७ अर्ज
  प्रभाग क्र. १२ – १६ अर्ज
  प्रभाग क्र. १३ – ०९ अर्ज
  प्रभाग क्र. १४ – ०९ अर्ज
  प्रभाग क्र. १५ -०७ अर्ज
  प्रभाग क्र. १६ -०८ अर्ज
  प्रभाग क्र. १७ -०७ अर्ज दाखल झाले. दि. ८ रोजी सकाळी ११नंतर लोणंद नगरपंचायत सभागृहात ऊमेदवारी अर्ज छाननी प्रक्रीया होणार आहे.