सातारा तालुक्यातील १९१ गावांना २२ कोटी १५ लाख निधी 

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांचे एकहाती वर्चस्व असलेल्या सातारा पंचायत समितीने सातारा तालुक्यातील १९१ ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगातून तब्ब्ल २२ कोटी १५ लाख १० हजार २४६ रुपये निधी उपलब्ध केला आहे.

    सातारा : आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांचे एकहाती वर्चस्व असलेल्या सातारा पंचायत समितीने सातारा तालुक्यातील १९१ ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगातून तब्ब्ल २२ कोटी १५ लाख १० हजार २४६ रुपये निधी उपलब्ध केला आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या सूचनेनुसार तालुक्यातील प्रत्येक गावातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, संबंधित ग्रामपंचायतींनी पंचायत समितीकडे संपर्क साधावा, असे आवाहन सभापती सरिता इंदलकर आणि उपसभापती अरविंद जाधव यांनी केले आहे.

    सातारा तालुक्यातील आगुंडेवाडी, आकले, आलवडी- धावली, आंबळे रायघर, आंबवडे बु., आंबवडेखु., आंबेवाडी, अंगापूर तर्फ तारगाव, अंगापूर-वंदन, अपशिंगे, आरळे, आरे तर्फ परळी, आरगडवाडी, आरफळ, आष्टे, आसनगाव, आसगाव, अटाळी -सावली, अतीत, आवाडवाडी, बसाप्पाचीवाडी, बेंडवाडी, भैरवगड, भरतगाव, भरतगाववाडी, तुकाईवाडी, उपळी, वडूथ, वळसे, वनगळ, वर्णे, वर्ये, वासोळे, वेचले, वेळे, वेनेगाव, वेणेखोल, विजयनगर, वडगाव, वाढे, वावदरे, यादववाडी, यतेश्‍वर, झरेवाडी या गावांसह इतर अनेक गावांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

    संबंधित ग्रामपंचायतींनी ठराव करून पंचायत समिती कार्यालयात तातडीने संपर्क साधावा आणि उपलब्ध झालेल्या निधीतून गावातील विकासकामे मार्गी लावावीत, असे आवाहन इंदलकर आणि जाधव यांनी केले आहे.