रात्री किरणामालाचे दुकानफोडून ६० हजाराचा माल लंपास

दुकान उघडण्यास आले असता त्यांना त्यांच्या दुकानाचे कुलूप तोडल्याचे व शटर उघडे असल्याचे निदर्शनास आले आज पाहिले असता दुकानाच्या आतील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे त्यांच्या निदर्शनात आले.

    लोणंद: नीरा लोणंद रोडवर सिद्धिविनायक हॉस्पिटल शेजारी असणाऱ्या मलगुंडे किराणा दुकानाचे शटर चे कुलूप फोडून ६० हजार रुपयांचा किराणामाल चोरट्यांनी रातोरात लंपास केल्याची घटना घडली आहे. दुकानाचे मालक दादासाहेब भानुदास मलगुंडे यांनी लोणंद पोलिसात याबाबत तक्रार दिली आहे.
    दादासाहेब मलगुंडे हे नेहमीप्रमाणे आज सकाळी सव्वा आठच्या दरम्यान दुकान उघडण्यास आले असता त्यांना त्यांच्या दुकानाचे कुलूप तोडल्याचे व शटर उघडे असल्याचे निदर्शनास आले आज पाहिले असता दुकानाच्या आतील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे त्यांच्या निदर्शनात आले त्यांनी  तात्काळ लोणंद पोलिसांना ही माहिती दिली.
    यामध्ये त्यांचे दहा हजार रुपये किमतीचे जेमिनी कंपनीचे तेलाचे १५ लिटर चे पाच डबे, चॅम्पियन कंपनीच्या तेलाचे सोळा बॉक्स अंदाजे किंमत वीस हजार रुपये , ३४०० रुपयाचे १०० किलो साखर,  तीनहजार रुपयाची २०किलो तूरडाळ, तीन हजार रुपये किंमतीची मूग डाळ वीस किलो, ५० किलो तांदूळ किंमत आठ हजार रुपये, तसेच काजू दोन किलो, बदाम तीन किलो, दोन किलो वेलची सोसायटी, चहा पावडर  साबण बॉक्स, संतूर, हार्पिक, बिस्किट बिस्कीट चे पाच बॉक्स रोख दिड हजार रूपये असा ५८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरटयांनी लंपास केल्याची तक्रार देण्यात आली असून लवकरात लवकर या चोरट्यांचा तपास करावा अशी मागणी मलगुंडे यांनी व्यक्त केली आहे. तसेच केतकी गार्डन समोर असणारे आमिर चिकन शॉपचे कुलूप तोडून पाच ट्रे अंड्याची चोरी अज्ञात चोरांनी केल्याची माहीती आमिर काझी यांनी दिली.