There is no threat to the government, says Minister of State for Home Affairs Shambhuraj Desai ...

  पाटण : जुलै महिन्यामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे दळण-वळणाच्यादृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या ग्रामीण रस्त्यांचे, साकव पूलांचे, प्रमुख जिल्हा मार्ग, राज्य मार्ग यांचे मोठ्या प्रमाणांत नुकसान झाले होते. त्यामुळे या मार्गांवरुन दळण-वळणाची मोठी गैरसोय होत असल्याने या नुकसान झालेल्या विविध‍ विकासकामांचे पुनर्बांधणीसाठी राज्य शासनाच्या डिसेंबरच्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूद होण्यासाठी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिफारस केली होती.

  त्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ग्रामीण रस्त्यांचे व साकव पुलांच्या कामांसाठी ५० कोटी तर प्रमुख जिल्हा मार्ग, राज्य मार्ग यांच्या भूसंपादनासह सुधारणा करण्याच्या कामांसाठी २२ कोटी ४ लाख असा एकूण ७२ कोटी ४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

  अशी आहेत मंजूर कामे…

  पाटण-मणदुरे-जळव-तारळे- पाल रस्ता पाटण ते साखरी रुंदीकरणासह सुधारणा ३ कोटी २० लाख…

  पाटण-मणदुरे-जळव-तारळे पाल-निवडे पुनर्वसन ते पाल रुंदीकरणासह सुधारणा २ कोटी ३० लाख…

  वाखानवस्ती कराड-ढेबेवाडी सणबुर-महिंद-नाटोशी-मोरगिरी- चाफेर- महिंद ते गडगडा भुसंपादन व सुधारणा २ कोटी.

  चरेगांव- चाफळ-दाढोली- महाबळवाडी- येरफळे-त्रिपुडी- चोपडी-बेलवडे-आंब्रुळे-कुसरुंड- नाटोशी रस्ता येरफळे ते त्रिपुडी भुसंपादन व सुधारणा १ कोटी…

  सातारा-गजवडी-चाळकेवाडी-घाणबी-केर-पाटण-घाणबी फाटा ते घेरादातेगड फाटा सुधारणा ९० लाख.

  नागठाणे-तारळे-पाटण रस्ता कोंजवडे फाटा ते वजरोशी रुंदीकरणासह सुधारणा २ कोटी.

  इजिमा 138 ते निगडे- कसणी-निवी-डाकेवाडी- धामणी – चव्हाणवाडी-मस्करवाडी- घराळवाडी रस्ता कसणी गावाजवळ लहान पुलाचे बांधकाम २ कोटी.

  नाडे-सांगवड-मंद्रुळकोळे- ढेबेवाडी रस्ता वांग नदीवर मंद्रुळकोळे येथे मोठया पुलाचे बांधकाम ६ कोटी ५० लाख.

  त्रिपुडी-मुळगांव-कवंरवाडी-नेरळे- गुंजाळी-लेढोंरी-मणेरी-चिंरबे

  काढोली-चाफेर-रिसवड-ढोकाळे कवरवाडी ते चेवलेवाडीचे बांधकाम २ कोटी ५० लाख या कामांचा समावेश आहे.

  राज्य शासनाच्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये मंजूर झालेल्या विकास कामांची लवकरच निविदा कार्यवाही करण्यात येऊन दळण-वळणाच्यादृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या रस्त्यांची कामे तातडीने हाती घेण्यात येणार आहेत.