…अन् ८० वर्षांच्या आजी झाल्या साक्षर !

    वावरहिरे : माण तालुक्यातील या ठिकाणी सुरू असलेल्या ‘घरोघरी शाळा’ या उपक्रमांतर्गत नवीन शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या घरातच तयार करण्यात आलेल्या स्वतंत्र शाळेचे उद्घाटन सातारा जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी वडगाव गावचे सुपुत्र व वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओबासे उपस्थित होते.

    ‘घरोघरी शाळा’ या उपक्रमांतर्गत अनेक जण साक्षर झाले. त्यामध्ये ८० वर्षांच्या आजीही साक्षर ठरल्या. या आजीबाई शाळेत कधीच गेल्या नव्हत्या. अशिक्षित राहिल्या होत्या. या आजी “घरोघरी शाळा” उपक्रमामुळे साक्षर झाल्या. भिंतीवर लावलेल्या तक्त्यांची डोळ्यांना सतत ओळख झाली. अक्षरे सतत येता-जाता डोळ्याखालून जाऊ लागली. आजी ते सहज वाचू लागल्या. कधी शाळेत न गेल्याने अशिक्षित राहिलेल्या आजी घरोघरी शाळा या उपक्रमामुळे साक्षर झाल्या. गौडा आणि ओबासे यांनी या आजीचं कौतुक केले.