
वाई : सुरूर (ता. वाई) येथील स्मशानभूमीमध्ये (Surur Cemetery) जादुटोणा करणाऱ्या पुणे येथील सहा जणांना भुईंज पोलीस पाेलीसांनी तक्रार दाखल होतच अवघ्या दोन तासांमध्येच हडपसर पुणे येथे सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांना भुईंज पोलीस ठाण्यात आणून गुन्हा दाखल करून वाईच्या न्यायालयात उभे केले असता त्यांना दि. ३० पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश. न्यायालयाने दिले आहेत.
दोन दिवसापूर्वी सुरूर तालुका वाई येथील राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धा स्थान असलेल्या धावजी पाटील मंदिर पासून काही अंतरावर असलेल्या स्मशानभूमीत देवृषी असलेला राहुल राजेंद्र भोसले (वय २७, रा. हडपसर, पुणे याने जादूटोणा करण्यासाठी एका अल्पवयीन मुलीला सोबत आणले होते. या मुलीचे पालक नितीन लक्ष्मण चांदणे (वय ३९, रा. रामटेकडी हडपसर), विशाल बाबासाहेब सोळसे (वय ३२), सुनिता नितीन चांदणे (वय ३५), सुमन बाबासाहेब सोळसे (वय ५०), केशर लक्ष्मण चांदणे (सर्वजण राहणार हडपसर, पुणे) येथून वाई तालुक्यातील सुरूर या गावी दोन दिवसापूर्वी येऊन एका १२ ते १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर जादूटोणा सारखे प्रयोग करत असताना तेथिल तरुणांनी या भयानक गोष्टीचा व्हिडिओ तयार करून तो व्हाॅट्सअप ग्रुप वर व्हायरल केला होता. त्याची गंभीर दखल भुईंज पोलिस ठाण्याचे सपोनि आशिष कांबळे यांनी घेऊन अज्ञाताण विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
भुईंज पोलिसांची कामगिरी
कसलाही पुरावा नसताना देखील या गुन्ह्याची उघड करण्यासाठी आशिष कांबळे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे असताना देखील त्यांनी भुईंज पोलिसांचे एक पथक तयार करून हडपसर इथे रामटेकडी परिसरात राहणारे देवऋषी राहुल राजेंद्र भोसले, नितीन लक्ष्मण चांदने, विशाल बाबासाहेब सोळसे, सुनिता नितीन चांदने, सुमन बाबासाहेब सुळसे, केसर लक्ष्मण चांदणे या सर्वांना अटक करण्यासाठी पथकाला आदेश दिले होते. या पथकाने रामटेकडी हडपसर पुणे येथे दोनच तासांमध्ये वरील सर्वांना ताब्यात घेऊन भुईंज पोलिस स्टेशनमध्ये आणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली. न्यायलयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.