वन विभागाच्या धडाकेबाज कारवाईत २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त ; पिकअप जप्त करून एकावर गुन्हा दाखल

भुईंज वन विभागातील वन परिमंडळाचे वनपाल संग्राम मोरे, वनरक्षक संजय आडे, रजिया शेख या कर्मचाऱ्यांना दिनांक २६ सप्टेंबर रोजी भुईंज ता. वाई येथील नामदेव अधिकराव राठोड हा आपल्या मालकीची पिकअप क्रमांक HM.४६.E.४६९५ मधून भुईंज गावच्या हद्दीत वन विभागाची कसलीही परवानगी न घेताच झालेल्या लिंबाच्या झाडाच्या लाकडाची मालवाहतूक करणार असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली होती.

    ओझर्डे : भुईंजच्या वनविभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सापळा रचून पिकअपसह २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामूळे अनधिकृत वृक्ष तोड करणाऱ्यान मध्ये खळबळ उडाली आहे.

    सविस्तर वृत्त असे की, भुईंज वन विभागातील वन परिमंडळाचे वनपाल संग्राम मोरे, वनरक्षक संजय आडे, रजिया शेख या कर्मचाऱ्यांना दिनांक २६ सप्टेंबर रोजी भुईंज ता. वाई येथील नामदेव अधिकराव राठोड हा आपल्या मालकीची पिकअप क्रमांक HM.४६.E.४६९५ मधून भुईंज गावच्या हद्दीत वन विभागाची कसलीही परवानगी न घेताच झालेल्या लिंबाच्या झाडाच्या लाकडाची मालवाहतूक करणार असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली होती. ही खबर मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी भुईंज चिंधवली ता.वाई जाणाऱ्या रस्त्यावर सायंकाळी पाच वाजल्यापासूनच फिरती तपासणीच्या नावाखाली सापळा लावला होता. या सापळ्यांमध्ये रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास नामदेव राठोड हा आपल्या गाडीतून लिंबाची लाकडे भरून भुईंज चिंधवली रस्त्याने जात असताना तो या वनविभागाने लावलेल्या सापळ्यात अडकला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ लाकडासह पिकअपचा पंचनामा करून २ लाख रुपयांचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त केला आहे. तसेच त्याच्यावर वनविभागाचा तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला आहे.

    गेल्या महिनाभरापासून भुईंजच्या वन विभाग कर्मचाऱ्यांनी असले, पाचवड, अमृतवाडी, आणि भुईंज या परिसरात विनापरवाना होत असलेल्या लाकडांच्या वाहतुकीवर करडी नजर ठेवत धडाकेबाज कारवाई केल्याने या परिसरातील व वाई तालुक्यातील अनधिकृत झाडे तोडून वाहतूक करणाऱ्या ठेकेदारांनमध्ये खळबळ उडाली आहे. ही कारवाई सातारा येथील उप वनसंरक्षक महादेव मोहिते, सहाय्यक वन संरक्षक सुधीर सोनावले वाई वन विभागाच्या महिला वनक्षेत्रपाल असलेल्या श्रीमती स्नेहल मगर यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडाकेबाज कारवाई करण्यात आल्याची माहिती भुईंजच्या वनविभागाच्या कर्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे