“मला काल सहा तास कोंडून ठेवण्यात आलं, मी हात जोडून विनंती केली की…” अटकेनंतर सोमय्यांचा संताप

"मला चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय, बाकीचे विषय आम्ही बघतो, तुम्ही मुश्रीफांचे घोटाळे जनतेसमोर मांडा बाकी अधिकाऱ्यांवरील गदांबाबत आम्ही बघतो.”

    कराड : महाराष्ट्राचे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ Hasan Mushrif यांचे भ्रष्टाचार उघड करण्यासाठी कोल्हापुरला Kolhapur निघालेल्या भाजप BJP नेते किरीट सोमय्या Kirit Somaiya यांना कराड पोलिसांनी Karad Police ताब्यात घेतली. यानंतर आता किरीत सोमय्या यांनी कराडमध्ये पत्रकार परिषद घेत चांगलाच संताप व्यक्त केला आहे. “आम्ही हिंदू म्हणून रोखता? उद्धवजी तुम्ही हिरवा रंग धारण करा” असं म्हणत राष्ट्रवादी NCP व शिवसेनेवर Shiv Sena भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.

    या पत्रकार परिषदेत सोमय्या म्हणाले की, “हसन मुश्रीफांमुळे मला अंबाबाईचं दर्शन करता आलं नाही. मला काल सहा तास कोंडून ठेवण्यात आलं. मी हात जोडून विनंती केली की ऑर्डर दाखवा. पोलिसांनी मला कोणत्या आदेशाअंतर्गत मला गणेश विसर्जनापासून रोखलं. पुराव्यासह मी कागल पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार होतो पण मला अडवलं गेलं. आम्ही हिंदू म्हणून रोखता? उद्धवजी तुम्ही हिरवा रंग धारण करा” असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.

    पुढे बोलताना सोमय्या म्हणाले की, “हसन मुश्रीफ यांच्याविरोधात अर्थमंत्रालय, ईडी चेअरमन, इडी डायरेक्टर, सहकार मंत्रालय २७०० पानांची कागदपत्र दिली आहेत. त्यावर चौकशी सुरु झाली आहे. आणखी माहिती ईडीने मागितली आहे, ती माहिती दोन दिवसात देणार आहे. ईडी आणि केंद्राने चौकशी सुरु केली आह., त्या भीतीने माझ्यावर हल्ला करण्याची भीती होती का?”

    “मूळ विषय हा आहे की, हसन मुश्रीफ 127 कोटी रुपये आपल्या कंपनीत मनी लाँडरिंगचे आले त्याचा हिशेब अजून का दिला नाही? शरद पवार साहेब ही तुमची व्यूवरचना आहे का.. मला चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय, बाकीचे विषय आम्ही बघतो, तुम्ही मुश्रीफांचे घोटाळे जनतेसमोर मांडा बाकी अधिकाऱ्यांवरील गदांबाबत आम्ही बघतो.”

    “मला मुश्रीफांना आणखी एक प्रश्न विचारायचा आहे, आपला आणि अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना याचा संबंध काय? मुश्रीफ यांच्या परिवाराने अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा केला. यामध्येही शेल कंपन्यांद्वारे पैसे उभारले. बोगस अकाऊंट उघडून कॅश टाकायचे आणि पैसे घ्यायचे, १०० कोटी रुपये घेतले.” असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.