वडूज नगरपंचायत निवडणूक : एकूण १७ जागांसाठी तब्बल १७२ जणांचे अर्ज,ओबीसी उमेदवारांमध्ये नाराजी

नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण असणाऱ्या प्रभाग एक, पाच, चौदा व सतरा या चार प्रभागातील आरक्षण रद्द झाल्याने येथील निवडणूका होणार नाहीत. प्रमाणा पेक्षा जास्त अर्ज दाखल झाल्याने दि. ८,९,१० हे तीन दिवस अर्जाचीछाननी होणार असून अर्ज माघार दि. १३ रोजीपर्यंत घेण्यात येणार आहेत.

    विनोद खाडे, वडूज : खटाव तालुक्यातील एकमेव आणि एकूण १७ प्रभाग असलेल्या वडूज नगरपंचायत निवडणूक मतदान मंगळवारी दि २१ डिसेंबर रोजी होत असून असून दि २२ रोजी मतमोजणी होणार आहे. अर्ज भरण्याची तारीख दि १ डिसेंबर ते ७ डिसेंबर असून अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख १३ डिसेंबर आहे.या नगरपंचायतची

    आरक्षण रचना
    प्रभाग क्र. – १ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला,प्रभाग क्र. – २ सर्वसाधारण महिला
    प्रभाग क्र. – ३ सर्वसाधारण महिला,प्रभाग क्र. – ४ सर्वसाधारण,प्रभाग क्र. – ५ नागरिकांचा मागास प्रवर्ग(महिला),प्रभाग क्र. – ६ सर्वसाधारण महिला,प्रभाग क्र. – ७ सर्वसाधारण महिला,प्रभाग क्र. – ८ सर्वसाधारण ,प्रभाग क्र. – ९ सर्वसाधारण , प्रभाग क्र. – १० अनुसूचित जाती जमाती ( महिला ),प्रभाग क्र. – ११ अनुसुचित जाती , प्रभाग क्र. – १२ सर्वसाधारण,प्रभाग क्र. – १३ सर्वसाधारण महिला,प्रभाग क्र. – १४ नागरिकांचा मागास प्रवर्ग ,प्रभाग क्र. – १५ सर्वसाधारण महिला,प्रभाग क्र. – १६  सर्वसाधारण,प्रभाग क्र. – १७ नागरिकांचा मागास प्रवर्ग याप्रमाणे जाहीर करण्यात आली होती.

    केवळ २७ दिवसांवर निवडणूक आल्याने आरक्षणामध्ये दांडी गुल झालेल्या इच्छुक उमेदवाराना दुसरा सुरक्षित प्रभाग शोधण्यासाठी कमालीची धावपळ करावी लागली.मात्र या निवडणुकीत नवीन उमेदवार अनेक जण इच्छुक असल्याने जुन्या उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.त्याच बरोबर सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण स्थगिती दिल्यानं ही निवडणूक ओबीसी प्रभाग सोडून इतर सर्व प्रभागासाठी घेतली जाणार असल्याचे संबंधित विभागाचे वतीने सांगण्यात आले आहे. मात्र ओबीसी आरक्षण स्थगिती मुळे नाराजी व्यक्त होत आहे.

    एकूण १७ जागांसाठी तब्बल १७२ अर्ज
    नगरपंचायतीच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी १७ जागांसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण १७२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.वडूज नगरपंचायत समिती निवडणूक चौरंगी होत आहे. यामध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, शिवसेना तर काही जागांवर अपक्ष स्वतंत्र लढत आहेत. १७ जागासाठी एकूण १७२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

    प्रभागनिहाय उमेदवारी अर्ज
    यात प्रभाग क्रमांक एकमध्ये ११, प्रभाग क्रमांक दोनमध्ये ८, प्रभाग क्रमांक तीनमध्ये ११, प्रभाग क्रमांक
    चारमध्ये ७, प्रभाग क्रमांक पाचमध्ये ७,प्रभाग क्रमांक सहामध्ये १२,प्रभाग क्रमांक सातमध्ये ६, प्रभाग क्रमांक
    आठमध्ये ७, प्रभाग क्रमांक नऊमध्ये १२, प्रभाग क्रमांक दहामध्ये १०, प्रभाग क्रमांक अकरामध्ये १७, प्रभाग क्रमांक बारामध्ये ९, प्रभाग क्रमांक तेरामध्ये ५, प्रभाग क्रमांक चौदामध्ये ८, प्रभाग क्रमांक पंधरामध्ये ११, प्रभाग क्रमांक सोळामध्ये १५ व प्रभाग क्रमांक सतरामध्ये ८, असे एकूण १७२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

    परंतू नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण असणाऱ्या प्रभाग एक, पाच, चौदा व सतरा या चार प्रभागातील आरक्षण रद्द झाल्याने येथील निवडणूका होणार नाहीत. प्रमाणा पेक्षा जास्त अर्ज दाखल झाल्याने दि. ८,९,१० हे तीन दिवस अर्जाची
    छाननी होणार असून अर्ज माघार दि. १३ रोजीपर्यंत घेण्यात येणार आहेत. त्यानंतरच १७ जागांसाठी एकूण कितीजण रिंगणात राहणार हे चित्र स्पष्ट होणार आहे.