महाबळेश्वरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मुलगी बाळंत झाल्यावर समोर आला राजकारण्यांच्या मुलांनी केलेला घृणास्पद प्रकार

महाबळेश्वरमध्ये(Mahabaleshwar) अल्पवयीन मुलीवर अत्याचार(Minor Girl Assault) करण्यात आला आहे. मुलीने बाळाला जन्म दिल्यानंतर सगळा प्रकार समोर आला आहे.

    सातारा : महाबळेश्वरमध्ये(Mahabaleshwar) अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी शिवसेनेच्या (Shivsena Leader`s sons Arrested) माजी नगराध्यक्षाच्या दोन मुलांसह ११ जणांवर गुन्हे दाखल(Mahabaleshwar Crime) करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी सागर उर्फ आबा हनुमंत गायकवाड आणि आशुतोष बिरामणे  यांना ताब्यात घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

    या दोघांना सातारा येथील जिल्हा विशेष सत्र न्यायालयाकडून २७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर गुरुवारी या प्रकरणात सहभागी असलेल्या आणखी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये महाबळेश्वर नगरीचे माजी नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते डी. एम. बावळेकर यांचे दोन मुलगे सनी बावळेकर आणि योगेश बावळेकर यांचादेखील समावेश असल्यामुळे महाबळेश्वरमध्ये खळबळ उडाली आहे.

    संबंधित संशयितांनी पीडित कुटुंबियांनी तक्रार देऊ नये यासाठी धमकी दिल्याचे सांगितले.त्यामुळे पीडित कुटुंब तक्रार देण्यास पुढे येत नव्हते. मात्र पोलीस उप विभागीय अधिकारी डॉ शीतल जानवे यांनी विश्वासात घेत तपास सुरू केला. संशयितांना ताब्यात घेतले.तसेच गुन्हा दाखल केला.

    या प्रकरणाची कुठेही वाच्यता होणार नाही याची काळजी आरोपींनी घेतली होती. या प्रकरणी मुलीला दत्तक देताना कायदेशीर प्रक्रियेचा वापर न केल्यामुळे सहभागी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधीही बावळेकर यांचा मुलगा योगेशवर व्हॉट्स अपवर अश्लील चित्रफीत व्हायरल करण्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणामुळे सध्या साताऱ्यासह महाबळेश्वरमध्ये खळबळ माजली असून पोलीस सदर प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

    दुसरीकडे, सातारा जिल्ह्यात एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणाने १८ वर्षीय मुलीची भरदिवसा भर चौकात गळा चिरुन हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित घटना ही पाटण तालुक्यातील चाफळ येथे घडली आहे. विशेष म्हणजे मुलीची हत्या करुन आरोपी पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने स्वत:हून आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. चैतन्या बाळू बंडलकर असं हत्या झालेल्या मुलीचं नाव आहे. तर अनिकेत मोरे असं हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव आहे.