भुईंजमध्ये एकावर चाकूचे सपासप वार

    ओझर्डे : भुईंज कृष्णा पुलाशेजारी घरात घुसून एकावर चाकूने सपासप वार केल्याने त्यात आदर इनामदार हे गंभीर जखमी झाले. या घटनेने भुईंज गावात खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचा मोठा फौजाफाटा तैनात करण्यात आला. त्यानंतर घटनास्थळाला पोलिस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले.

    अडीच महिन्यांपूर्वीही येथील एकाचा एका टोळीने हल्ला करुन तरुणाचा खून केला होता. ही घटना ताजी असतानाच पुन्हा अज्ञात तीन हल्लेखोरांनी जिवे मारण्याच्या उद्देशानेच आदर इनामदार यांच्यावर चाकूने सपासप वार केल्याने खळबळ उडाली. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पुणे सातारा महामार्गावरील भुईंज कृष्णा पुलाजवळ राहणारे हणमंत किसन कणसे यांच्या घरात रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घरात घुसून आदर जब्बार इनामदार यांच्यावर लाठ्या काठ्यांनी हल्ला केला.

    तसेच त्यांच्या पोटात धारदार चाकूने सपासप वार केले. त्यामध्ये आदर इनामदार हे गंभीर जखमी झाले. त्यांना जखमी
    अवस्थेत सातारा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.