चित्रकार बाबा पवारांनी साकारले अनाेखे शुभेच्छापत्र; ‘बागुलबुवा’ची ‘इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड’मध्ये नोंद

कोरोना महामारीने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे विदारक चित्र आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावर जो परिणाम झाला आहे. तो काव्य-चित्र शुभेच्छापत्राद्वारे मांडण्याचा प्रयत्न विंग (ता. कराड) येथील कलाशिक्षक बाबा पवार यांनी केला आहे.

  कराड : कोरोना महामारीने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे विदारक चित्र आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावर जो परिणाम झाला आहे. तो काव्य-चित्र शुभेच्छापत्राद्वारे मांडण्याचा प्रयत्न विंग (ता. कराड) येथील कलाशिक्षक बाबा पवार यांनी केला आहे.

  बागुलबुवा या काव्य-चित्र शुभेच्छापत्राद्वारे २०२२ या नववर्ष आणि मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या उपक्रमाची नोंद महाराष्ट्र बुकसह (Maharashtra Book) एशिया बुक व इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड बुकमध्ये (India Book of Record) घेण्यात आल्याने कराड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

  बाबासाहेब पवार विंग (ता. कराड) येथील पी. जी. व्ही. पी. हायस्कूलवर कलाशिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांना कलेची आवड आहे. विविध छंद जोपसण्यासाठी ते सतत घडपडत असतात. त्यांनी टाकाऊ लग्नपत्रिका व वृत्तपत्राच्या रद्दीपासून गणेशमूर्ती साकारल्या आहेत. नवनिर्मितीचा वेध घेत त्यांनी अनोखे भेटकार्ड तयार करण्याचा उपक्रम गेली १३ वर्षापासून सुरू आहे. समाजातील ज्वलंत प्रश्नावर चित्रकलेच्या माध्यमातून प्रबोधनात्मक काम त्यांनी हाती घेतले आहे.

  यंदा २०२२ च्या शुभेच्छा कार्डावर करोना महामारी जगातील उद्ध्वस्त झालेले शिक्षण, बंद शाळा व शैक्षणिक जीवनावर झालेले परिणाम यावर भाष्य करत मांडलेला कलात्मक शुभेच्छा संदेश याची दखल एशिया बुक व  इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड बुकमध्ये घेण्यात आली आहे.

  कलात्मक आविष्कार

  व्हाट्सअप, इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक आदी सोशल माध्यमांच्या आधुनिक युगात ग्रीटिंग कार्ड्स शुभेच्छापत्र आदी जुन्या शुभेच्छा पद्धती जवळपास बंदच झाल्या आहेत. युवापिढी सोशल माध्यमाकडे वळली आहे. मात्र, बदलत्या संगणक युगात कलाशिक्षक बाबासाहेब पवार यांनी सोशल मीडियाला फाटा देत हस्तलिखित अनोखी भेटकार्डद्वारे शुभेच्छा देण्याची परंपरा अखंडपणे १३ वर्ष जपली आहे. या कार्यातून समाजप्रबोधनाचे महत्त्वपूर्ण पवार करत आहेत.
  वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न

  समाजप्रबोधनाचा संदेश

  पर्यावरण वाचवा, लेक वाचवा, ग्लोबल वॉर्मिंग, बळीराजाच्या व्यथा मांडून ते समाजप्रबोधनाचा संदेश त्याद्वारे ते देत आहेत.
  धडाडणारं काळीज व काळजाला भिडणाऱ्या सूर्य या कवितेतून त्यांनी महापुरातील शेतकऱ्यांची वस्तुस्थिती मांडून २०२०मध्ये तरी त्यांना सुख समृद्धी मिळावी, ही भावना व्यक्त केली होती. या काव्यचित्र शुभेच्छा पत्र उपक्रमाची नोंद महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली. तर कन्हाडच्या शब्दवेध संस्थेनीही त्याची दखल घेतली आहे.