भेकवलीच्या मनोरूग्णास अखेर येरवडा मनोरुग्णालयात केलं दाखल

    महाबळेश्वर : जागरूक नागरिक, पत्रकार व पोलिसांनी घेतलेल्या दक्षतेमुळे भेकवली येथील येथील एका मनोरूग्णास महाबळेश्वर पोलिसांनी पुढील उपचारासाठी पुणे येथील येरवडा येथील मनोरूग्ण रूग्णालयात दाखल करण्यात आले. मनोरूग्णावर आलेले संकट आता टळले असून, लवकरच तो मनोरूग्ण आपल्या जीवघेण्या आजारातून बरा होईल, असा विश्वास भेकवलीतील नागरिक व्यक्त करीत आहेत.

    भेकवली येथील सागर सुभाष केळगणे (वय २६) हा 12 वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या युवक हा घरातील लोकांनी केलेल्या छळामुळे मनोरूग्ण झाला. तो सातारा येथील एका हाॅटेलमध्ये कामाला होता. पंरतु तेथुन त्याचा भाव मंगेश सुभाष केळगणे याने घरी आणले. त्यानंतर त्या तरूणाच्या वागण्यात फरक पडला म्हणून त्याच्या घरच्या लोकांनी सागर यास एका अंधारया खोलीत डांबून ठेवले होते. तसेच तो त्रास देतो म्हणून एका लोखंडी खाटेला बांधुन ठेवण्यात आले होते. त्याच्या अंगावर कपडेही नव्हते. त्याला त्याच्या घरातील लोकं मारहाण करत होते.

    पण सर्व हकीकत विजय बाबुराव केळगणे याने एका पत्रात लिहिली व ते पत्र महाबळेश्वर पोलिसांना दिले. महाबळेश्वर पोलिसांनी पत्रातील माहितीप्रमाणे तक्रारदार विजय केळगणे यास बोलावून घेतले. त्याचा जबाब घेतला. पंरतु त्यानंतर काही दिवस सागर याच्याबाबतीत काहीच फरक पडला नाही. अखेर विजय केळगणे यांनी महाबळेश्वर येथील पत्रकारांना याची माहिती दिली. येथील पत्रकारांनी महाबळेश्वर पोलिस निरीक्षक बी ए कोंडुभैरी यांची भेट घेतली व सागर यास उपचार होणे गरजेचे आहे. त्याला तातडीने त्या खोलीतून काढून एखादया चांगल्या रूगणालयात भरती करा, अशी विनंती केली. मात्र, सध्या कोरोनाचा काळ असल्याने सागर या मनोरूग्णाच्या उपचाराबाबत पोलिसांना प्रश्न पडला.

    पोलिसांनी सागरच्या घरातील नातेवाईकांना बोलावले व त्यांना सागर यास तातडीने रूग्णालयात दाखल करण्याच्या सुचना केल्या. नातेवाईकांनी काही दिवसांची मुदत मागितली त्या नुसार पोलिसांनी दोन दिवसांची मुदत दिली परंतु दोन दिवसात सागरच्या नातेवाईकांनी सागरला दवाखान्यात दाखल करण्या बाबत टाळाटाळ केली. पुन्हा काही दिवस गेले पत्रकारांनी अखेर या बाबतचे वृत्त प्रसिध्द करून त्या बाबत गृहराज्य मंत्री ना शंभुराज देसाई , जिल्हा पोलिस अधिक्षक , उपविभागीय पोलिस अधिकारी व तहसिलदार सुषमा चैधरी पाटील यांना कळविले. या सर्वांनी या प्रकरणाची गंभिर दखल घेतली या सर्वांनी पोलिस निरिक्षक बी ए कोंडुभैरी यांच्या बरोबर चर्चा करून त्यांना मनोरूग्णास उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले.