चेतन कोंडे यांनी खंडाळ्याचा पदभार स्विकारला

    खंडाळा : खंडाळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी म्हणून चेतन कोंडे यांनी पदभार स्विकारला असून, नगराध्यक्ष प्रल्हाद खंडागळे, गटनेते अनिरुध्द गाढवे यांच्या हस्ते शॉल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

    शहर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. योगेश डोके यांची बदली झाली. त्यांच्या जागी नव्याने चेतन कोंडे हजर झाले असून, त्यांनी नुकताच पदभार स्विकारला. दरम्यान, खंडाळा शहराचे नगराध्यक्ष प्रल्हाद खंडागळे, गटनेते अनिरुध्द गाढवे यांच्या हस्ते मुख्याधिकारी चेतन कोंडे यांचे शॉल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.

    यावेळी नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष दत्ता गाढवे, नगरसेवक साजिद मुल्ला, युवराज गाढवे, राहुल गाढवे, संतोष जाधव, भानुदास गाढवे, चंद्रकांत पवार, अजिंक्य चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.