Cold wave in Maharashtra! Freezing cold in Mahabaleshwar and Pachgani; The mercury reached zero degrees Celsius

उत्तर भारतासह महाराष्ट्रातही थंडीची लाट पसरली आहे. संपूर्ण राज्य कडाक्याच्या थंडीने गारठले असून अनेक ठिकाणी एक अंकी (अंश सेल्सिअस) तापमानाची नोंदही झाली आहे. 'मिनी काश्मीर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये आणि पाचगणीत हाडं गोठवणारी थंडी पडली आहे(Cold wave in Maharashtra! Freezing cold in Mahabaleshwar and Pachgani; The mercury reached zero degrees Celsius ).

    सातारा : उत्तर भारतासह महाराष्ट्रातही थंडीची लाट पसरली आहे. संपूर्ण राज्य कडाक्याच्या थंडीने गारठले असून अनेक ठिकाणी एक अंकी (अंश सेल्सिअस) तापमानाची नोंदही झाली आहे. ‘मिनी काश्मीर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये आणि पाचगणीत हाडं गोठवणारी थंडी पडली आहे(Cold wave in Maharashtra! Freezing cold in Mahabaleshwar and Pachgani; The mercury reached zero degrees Celsius).

    महाबळेश्वरात आज पहाटे तापमानाचा पारा शून्य अंश सेल्सिअसजवळ जावून पोहोचला होता. त्यामुळे महाबळेश्वरात दवबिंदू गोठतील अशी स्थिती निर्माण झाली होती. रवर्षी डिसेंबर महिन्यात वेण्णा लेक परिसरात दवबिंदू गोठत असतात. पण यावर्षी डिसेंबर महिन्यात अपेक्षित थंडी पडली नाही. पण जानेवारीच्या सुरुवातीपासून राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे.

    पावसाची शक्यता

    राज्यात थंडीची लाट सुरू असतानाच अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीटही सुरू झाल्याने चिंता वाढली आहे. मराठवाडा आणि विदर्भात पुढील दोन दिवसांत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून विदर्भात 12-14 जानेवारी दरम्यान काही ठिकाणी गडगडाटासह हलका ते मध्यम पावसांची शक्यता आहे.

    नाशकात शेकोटीने केला घात

    नाशिकमधील गोदाकाठालगत असलेल्या वाघाडी परिसरात एका महिलेचा मृतदेह आढळून आला. ही महिला आगीत होरपळली होती आणि तिच्या मृतदेहाच्या शेजारी शेकोटी होती त्यामुळे या महिलेचा शेकोटीमुळे होरपळून मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

    हे सुद्धा वाचा
    • 2022