केंद्र सरकारविरोधात कराडमध्ये काँग्रेसचे उपोषण

शेतकरी विरोधी कृषी कायद्यांच्याविरोधात दिल्लीत १०० दिवसांहून अधिक दिवस शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. या आंदोलन काळात ३०० पेक्षा अधिक शेतकरी शहिद झाले आहेत. मोदी सरकारने सुरुवातीला चर्चेचा दिखावा केला पणत्यानंतर तीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी मात्र मान्य केली नाही.

    कराड : केंद्रसरकारने लादलेल्या शेतकरीविरोधी तीन काळ्या कृषी कायद्यांविरोधात व इंधन दरवाढी विरोधात कराड दक्षिण काँग्रेस कमिटीच्या वतीने कराड येथील तहसील कार्यालयासमोर आज शुक्रवारी एक दिवसीय उपोषण करण्यात आले. शेतकरी विरोधी कृषी कायद्यांच्याविरोधात दिल्लीत १०० दिवसांहून अधिक दिवस शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. या आंदोलन काळात ३०० पेक्षा अधिक शेतकरी शहिद झाले आहेत. मोदी सरकारने सुरुवातीला चर्चेचा दिखावा केला पणत्यानंतर तीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी मात्र मान्य केली नाही.

    सुरुवातीपासूनच या आंदोलनाला व काळ्या कृषी कायद्यांना काँग्रेस पक्षाचा विरोध राहिला आहे. यासाठी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निर्देशावरून देशभर आंदोलने करण्यात आली तसेच खा राहुल गांधी यांनी पंजाब-हरियाणा येथे ट्रॅक्टर रॅली काढून आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. याचबरोबर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने सुद्धा राज्यभर शेतकरी कायद्याविरोधात सह्यांची मोहीम राबविण्यात आली व या माध्यमातून६० लाख सह्यांचे निवेदन राष्ट्रपती यांना देण्यात आले.

    याचबरोबर दिवसेंदिवस पेट्रोल डिझेल चे दर वाढत चालले आहेत. पेट्रोल १०० रुपयांच्या घरात पोहचले आहे. तर गॅस सिलेंडर ८५० रुपयांवर पोहचले आहे. या दरांमुळे महागाई प्रचंड वाढत चालली आहे. महागाई मुळे जनतेचे जीवन असह्य झालेले आहे. रोजचे जीवनमान कोलमडले आहे. असे असूनसुद्धा केंद्र सरकार इंधनाच्या दरावर भडीमार करीत सर्वसामान्य जनतेच्या खिश्यावर दरोडा घालत आहे.

    यामुळे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सर्वसामान्य जनतेच्या व शेतकर्‍यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे व त्यांचा आवाज बनून वेळोवेळी आंदोलन करून झोपलेल्या केंद्र सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेवरून कराड दक्षिण काँग्रेस कमिटीच्या वतीने आज तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे उपोषण करण्यात आले.

    यावेळी आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण,काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उदयसिंह पाटील, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, कराड दक्षीण काँग्रेस अध्यक्ष मनोहर शिंदे, राजेंद्र चव्हाण, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र माने, नगरसेवक इंद्रजीत गुजर, राहुल चव्हाण, जि. प. सदस्य निवास थोरात, मंगल गलांडे, पं. स. सदस्य नामदेव पाटील, पै. नानासो पाटील, नितीन थोरात, शिवाजी मोहिते, अशोक पाटील, विद्या थोरवडे, राजेंद्र यादव, सागर जाधव, किशोर येडगे, मोहन शिंगाडे, नानासो रैनाक, प्रशांत चांदे, जयंत कुर्‍हाडे, तानाजी चौरे, धनराज शिंदे, सिद्धार्थ थोरवडे आदींच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.