वादग्रस्त डॉ. एपीजे अब्दुल कलाम मार्केट इमारतीच्या उदघाटनाचा दुसरा मुहूर्त देखील हुकला

शहराच्या मुख्य बाजारपेठेत पोलिस ठाण्याजवळ पालिकेने दोन मजली डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम माकेर्ट इमारत बाधा वापरा व हस्तांतर करा या तत्वावर खाजगी विकासका कडुन बांधुन घेतली आहे प्रारंभा पासुनच ही इमारत वादात अडकलेली आहे दोन वर्षपूर्वी ही इमारत बांधुन तयार झाली परंतु या इमारतीची पाहणी न करताच आर्थिक तडजोडी करून तत्कालिन मुख्याधिकारी यांनी या इमारतीला पुणर्त्वाचा दाखला बहाल केला.

    महाबळेश्वर : बहुचचिर्त डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम मार्केट इमारतीचे उद्घाटन करण्याचा नगराध्यक्षा स्वप्नालि शिंदे यांनी केलेला दुसरा प्रयत्न देखिल असफल झाल्याने महाबळेश्वरकरांचे इमारत उद्घाटनाच्या तिसरया तारखेकडे लक्ष लागुन राहीले आहे.

    शहराच्या मुख्य बाजारपेठेत पोलिस ठाण्याजवळ पालिकेने दोन मजली डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम माकेर्ट इमारत बाधा वापरा व हस्तांतर करा या तत्वावर खाजगी विकासका कडुन बांधुन घेतली आहे प्रारंभा पासुनच ही इमारत वादात अडकलेली आहे दोन वर्षपूर्वी ही इमारत बांधुन तयार झाली परंतु या इमारतीची पाहणी न करताच आर्थिक तडजोडी करून तत्कालिन मुख्याधिकारी यांनी या इमारतीला पुणर्त्वाचा दाखला बहाल केला. दरम्यान या माकेर्ट इमारतीस पुणर्त्वाचा दाखला देणारे मुख्याधिकारी यांची बदली झाली आणि त्यांच्या जागी मुख्याधिकारी म्हणुन पल्लवी पाटील यांची नियुक्ती झाली. त्यांनी या इमातरीची पाहणी केली असता या इमारतीमध्ये मोठया प्रमाणावर बेकायदेशीर बांधकाम करण्यात आल्याचे निदशर्नास आले तेव्हा त्यांनी इमारतीचे हस्तातरण केले नाही. हस्तांतरा अभावी या इतारतीचे उद्घाटन लांबले विदयमान नगराध्यक्षा स्वप्नालि शिंदे यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात विकास कामाची अथवा भुमीपुजनाची एकही पाटी शहरात लागली नाही यावरून जनतेमध्ये उलट सुलट चर्चा सुरू होती विरोधक देखिल यावरून नगराध्यक्षांवर टिका करीत होते. या टिकेला चोख उत्तर देण्यासाठी नगराध्यक्षांनी बांधुन तयार असलेल्या इमारतीचे उद्घाटन करण्याच्या हालचाली सुरू केल्या उद्घाटनासाठी प्रथम ९ डिसेंबर हा मुहूतर् काढण्यात आला परंतु काही तांत्रिक कारणामुळे या दिवशी उद्घाटन झाले नाही. आता पाच वर्षांची कारकीर्द संपुष्टात येण्यासाठी केवळ दोन दिवसांचा अवधी उरला असता नगराध्यक्षांनी घाई घाईत २९ डिसेंबर हा उद्घाटनाचा दुसरा मुहूतर् काढला. या इमारतीच्या बांधकामात अनेकत्रुटी असल्याने मुख्याधिकारी यांनी या उद्घाटनास हिरवा कंदील दाखविला नाही. पंरतु प्रशासनास अंधारात ठेवुन नगराध्यक्षा यांनी या इमारतीचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न सुरू केला दरम्यान नगराध्यक्षा या इमारतीचे उद्घाटन करणार याची कुणकुण विरोधकांना लागली तेव्हा त्यांनी या संदभार्त पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप भागवत यांची भेट घेवुन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, उपनगराध्यक्ष अफजल सुतार, नगरसेवक किसनसेठ शिंदे, प्रकाश पाटील, रविंद्र कुंभारदरे, संदीप साळुंखे, संजय पिसाळ, स्नेहल जंगम, शारदा ढाणक, विमलताई ओंबाळे, विशाल तोष्णीवाल, तौफिक पटवेकर, दानिश मुलाणी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रशासनाला डावलुन हे उद्घाटन करण्यात येत आहे हे उद्घाटन म्हणजे पूर्ण राजकीय डावपेच आहे. अशा उद्घाटनास आमचा विरोध आहे असे स्पष्ट केले जर जबरदस्तीने उद्घाटन करण्याचा कोणी प्रयत्न केला तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका संभवतो अशी भुमिका विरोधी गटातील सर्वानी मांडली या बैठकीनंतर पोलिस निरीक्षक संदीप भागवत यांनी उद्घाटन सोहळा अयोजित करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या संबंधितांना बोलावुन विरोधकांनी इमारतीच्या उद्घाटनास विरोध केला असल्याचे स्पष्ट बजावले तेव्हा आयोजकांनी देखिल इमारत उद्घाटनाचा आपला हट्ट् सोडुन उद्घाटन सोहळा गुंडाळण्याचा निणर्य घेतला. अशा प्रकारे एकाच इमारतीच्या उद्घाटनाचे दोन मुहूतर् हुकले या संदभार्त शहरात उलट सुलट चर्चा सुरू आहे.