कोरोनामुळे विविध व्यवसायचालकांवर मजुरीची वेळ

आमच्याकडे दोन घोडी तसेच लग्नाचा बँड, आचारी, वाढपी असा सर्व जणांचा ग्रुप आहे परंतु गेले वर्षभर लग्नाची कामे मिळालीच नाहीत. स्वतःच्या कुटुंबाच्यासोबत जनावरांचे हाल डोळ्याने पाहवत नसल्याने ज्वारी काढणीसारखी कामे करण्याशिवाय पर्याय नसल्याने हि कामे करून कुटुंबाचा व घोड्यांचा खर्च भागवावा लागत असल्याचे श्री गणेश हॉर्स पाचवडचे संजय पवार, संदेश पवार, धीरज मोरे यांनी सांगितले.

    कवठे : वाई तालुक्याच्या पूर्व भागातील ज्वारी, गहू, हरभरा या पिकांची काढणी व मळणीची कामे अंतिम टप्प्यात असून गेले आठवडाभर सुरु असलेल्या पावसाच्या लपंडावामुळे शेतकरी वर्गात सुगीच्या कामांसाठी लगबग सुरु असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. गेले वर्षभर कोरोनोचा उद्रेक झाल्याने परराज्यातील विविध कामानिमित्त महाराष्ट्रात असलेले मजूर हे आपापल्या राज्यात परत गेले ते यंदाही कोरोनोच्या व लाँकडाउनच्या भीतीमुळे महाराष्ट्रात परतले नाहीत त्याचा फटका यावेळी मात्र शेतमजुरांच्या टंचाईने ज्वारी काढणीवेळी झाला. यामुळे ज्वारी काढणीचे दर ७००० रुपये ते ८००० रुपये एकरापर्यंत गेल्याचे चित्र वाई तालुक्यात दिसून आले.

    त्याचबरोबर तालुक्यातील विविध छोटे मोठे व्यवसायिकांचा व्यवसाय कोरोनोमुळे संपुष्ठात आल्याने या लोकांच्यावर सुद्धा उपासमारीची वेळ आल्याचे चित्र दिसून येत होते. लग्नासाठी ५० लोकांचे बंधन असल्याने घोडे, वाजंत्री, आचारी व वाढपी तसेच लाकूड व्यावसायिक यासारखे कामे करणा-या लोकांचे व्यवसायच ठप्प झाल्याने आपल्या कुटुंबांचा चरितार्थ कसा चालवावा हा बिकट प्रश्न या लोकांच्या समोर असल्याने यातून मार्ग काढण्यासाठी या लोकांनी शेतमजुरीचा मार्ग स्वीकारला तरीसुद्धा मजुरांची संख्या अल्प असल्याने यावेळी मजुरीचे दर शेतक-याच्या आवाक्याबाहेर गेल्याचे चित्र यावेळी दिसून येत होते. डोईवर पावसाने भरलेले आभाळ व दुसरीकडे मजुरांची कमतरता अश्या परिस्थितीत शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाल्याचे यावेळी जाणवत होते. मात्र ब-याच ठिकाणी पाऊस न पडल्याने हातातोंडाशी आलेली पिके शेतक-यांच्या पदरात पडली असून तालुक्याच्या पूर्व भागातील सुगीची लगबग उरकत आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

    कोरोनोने जगण्यासाठी मजुरी करण्याची वेळ