सुप्रसिध्द बावधन व फुलेनगर बगाड यात्रा रद्द ; कोरोनाच्या सावटामुळे प्रांताधिकार्‍यांचे आदेश

सध्याचा कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता प्रांताधिकारी राजापुरकर यांनी बावधन व परिसरातील पांढरेचीवाडी, वाघजईवाडी, शेलारवाडी, म्हातेकरवाडी, अनपटवाडी, नागेवाडी, दरेवाडी, कणूर, कडेगाव व फुलेनगर येथे यात्रा कालावधीत कलम १४४ लागू केले आहे. यात्रा कालावधीत बगाड व छबिना काढण्यास मणाई करण्यात आली असून नित्याचे धार्मिक विधी संबंधित पुजारी व पाच माणसांनी करण्यास परवानगी दिली आहे.

    वाई : राज्यभर सुप्रसिध्द असलेली बावधन (ता. वाई) येथील प्रसिध्द बगाड यात्रा तसेच फुलेनगर (ता. वाई) येथील बगाड यात्रा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रद्द करण्यात आली असून कलम १४४ लागू करण्यात आले आहे. देवाचे धार्मिक विधी करण्यासाठी पुजारी व पाच माणसांना परवानगी देण्यात आली आहे. तसे आदेश प्रांताधिकारी संगीता राजापुरकर-चौगुले यांनी काढले आहेत.

    राज्यभर बावधन बगाड यात्रा सुप्रसिध्द असून ही यात्रा व बगाडाचे बैल पाहण्यासाठी तालुका, जिल्हयासह राज्यातून विविध ठिकाणचे लोक येत असतात. बगाड मार्गावर प्रचंड प्रमाणात लोकांची गर्दी होत असते. यंदाची बावधन बगाड यात्रा २७ मार्च ते ४ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. तर शहराला लागून असलेल्या फुलेनगर येथीलही बगाड यात्रा मोठया उत्साहात काढण्यात येते. येथील बगाड पाहण्यासाठीही मोठया प्रमाणावर लोकांची गर्दी होते. यंदाची फुलेनगर बगाड यात्रा २७ मार्च ते १ एप्रिल रोजी होत आहे.

    सध्याचा कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता प्रांताधिकारी राजापुरकर यांनी बावधन व परिसरातील पांढरेचीवाडी, वाघजईवाडी, शेलारवाडी, म्हातेकरवाडी, अनपटवाडी, नागेवाडी, दरेवाडी, कणूर, कडेगाव व फुलेनगर येथे यात्रा कालावधीत कलम १४४ लागू केले आहे. यात्रा कालावधीत बगाड व छबिना काढण्यास मणाई करण्यात आली असून नित्याचे धार्मिक विधी संबंधित पुजारी व पाच माणसांनी करण्यास परवानगी दिली आहे. तसेच या कालावधीत सर्व सार्वजनिक, सांस्कृतिक, राजकिय व धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे.