स्वतः सोबत राहणाऱ्या आईला गावाला पाठवून दीपाली चव्हाण यांनी केली आत्महत्या

वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण या आपल्या आईसमवेत व्यंकटपुरा पेठ सातारा येथे रहावयास होत्या . मितभाषी सुस्वभावी अशा दिपाली यांच्या आयुष्याची नियतीने मोठी परिक्षा घेतली . त्यांच्या वडिलांचा हृदयविकाराने तर भावाचा दुर्धर आजाराने मृत्यू झाला . त्या आपल्या आईसमवेत रहात होत्या .

    मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरीसाल रेंजच्या RFO दीपाली चव्हाण यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. सायंकाळी ७ च्या सुमारास त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. वरिष्ठांच्या जाचामुळे आत्महत्या करत असल्याचं त्यांनी सुसाईड नोट मध्ये लिहून ठेवले. दीपाली चव्हाण आपल्या आईसोबत मेळघाटात राहात होत्या. मिळालेल्या माहितीनुसार गुरूवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास चव्हाण यांनी आईला बाहेरगावी पाठवले.

    गावाला गेल्यानंतर आईने फोन केला असता त्यांनी मोबाइल उचलला नाही. म्हणून त्यांच्या आईने हरिसाल येथे शेजारील गार्डशी संपर्क साधून घरी जाऊन पाहायला सांगितले. गार्डने घरी जाऊन पाहिले असता त्या घरात पडलेल्या आढळल्या. त्यांच्या शेजारी पिस्तुल पडलेले होते. चव्हाण यांच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसले तरी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा गावकर्‍यांमध्ये होती. चव्हाण यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेली सुसाइड नोट पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

    वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण या आपल्या आईसमवेत व्यंकटपुरा पेठ सातारा येथे रहावयास होत्या . मितभाषी सुस्वभावी अशा दिपाली यांच्या आयुष्याची नियतीने मोठी परिक्षा घेतली . त्यांच्या वडिलांचा हृदयविकाराने तर भावाचा दुर्धर आजाराने मृत्यू झाला . त्या आपल्या आईसमवेत रहात होत्या . तशाही परिस्थितीत २०१४मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन त्या थेट मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून रुजू झाल्या . त्यांचे पती अमरावती येथे कोषागार कार्यालयात सेवेत होते