
सातारा : ग्रामीण भागातील नागरिकांना ह्रदयविकाराचा झटका आल्यास त्याचे निदान प्राथमिक आरोग्य केंद्रात (Primary Health Center) करणे शक्य आहे. जिल्ह्यातील 72 केंद्रांवर इसीजी मशीन बसविण्याचा निर्णय सातारा जिल्हा परिषदेने घेतला आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांनी या माहितीला दुजोरा दिला. जिल्हा परिषद आरोग्य समिती बैठकीच्या निमित्ताने ही माहिती देण्यात आली. या बैठकीस समिती सदस्य डॉ. अभय तावरे, राजेश पवार, भाग्यश्री मोहिते, शारदा ननावरे, उषा देवी गावडे, डॉ. सचिन पाटील यावेळी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या विकास निधी संच प्रकल्पातून इसीजी मशीन खरेदी होणार असल्याचे विधाते यांनी स्पष्ट केले.