सातारा येथील कदम बाग परिसरात जुना आरटीओ चौकातील अतिक्रमणे हटविली

जुना आरटीओ चौकातील टपऱ्यांचा वाहतुकीला अडथळा होत असल्याची तक्रार शहर सुधार समिती ने नगरपालिकेकडे केली होती . या तक्रारीची दखल घेऊन शहर विकास विभागाने दखल घेतली . अतिक्रमण निरीक्षक प्रशांत निकम आणि पालिकेचे दहा कर्मचारी एक डंपर असा लवाजमा गुरुवारी दुपारी जुना आरटीओ चौकात पोहोचले .

    सातारा : येथील कदम बाग परिसरात जुना आरटीओ चौकातील जुन्या टपऱ्यांची अतिक्रमणे गुरुवारी हटविण्यात आली . अतिक्रमण हटाव पथकाने ही कारवाई करून रहदारीचा रस्ता मोकळा करण्यात आला .

    जुना आरटीओ चौकातील टपऱ्यांचा वाहतुकीला अडथळा होत असल्याची तक्रार शहर सुधार समिती ने नगरपालिकेकडे केली होती . या तक्रारीची दखल घेऊन शहर विकास विभागाने दखल घेतली . अतिक्रमण निरीक्षक प्रशांत निकम आणि पालिकेचे दहा कर्मचारी एक डंपर असा लवाजमा गुरुवारी दुपारी जुना आरटीओ चौकात पोहोचले . तक्रार करण्यात आलेल्या टपऱ्या कारवाई करून ताब्यात घेण्यात आल्या . काही विक्रेत्यांनी यावेळी कारवाईत हस्तक्षेप करून निकम यांच्याशी हुज्जत घातली . मात्र अतिक्रमण पथकाने कणखर बाणा दाखविल्यावर सर्वांचा विरोध मावळला . या टपऱ्या ताब्यात घेतल्यावर संबधित विक्रेत्यांना दंड करण्यात येणार असल्याचे प्रशांत निकम यांनी सांगितले .

    राजकीय दबावाची होतेय अडचणं

    सातारा शहरातील अनेक जागा बेकायदा टपऱ्यांनी व्यापलेल्या असताना राजकीय दबावाच्या कारणामुळे पालिकेला धडक कारवाई करण्याची अडचणं होत आहे . प्रत्येक कारवाईच्या दरम्यान कोणत्या तरी गाव पुढाऱ्याचा अथवा नगरसेवकाचा फोन येत असल्याची कर्मचारी खाजगीत तक्रार करत आहेत .बसाप्पा पेठ, आरटीओ कार्यालय, रविवार पेठ, या कारवायांमध्ये शहर विकास विभागाने पस्तीस हून अधिक टपऱ्या जप्त केल्या मात्र तरीही शहरातील वर्दळीच्या रस्त्यावरील अतिक्रमणांना हात घालण्याचे धाडस दाखविलेले नाही .