अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकरी व मेंढपाळाना नुकसान भरपाई द्यावी-गणेश भोसले

अवकाळी पावसाने गहू, ज्वारी, हरभरा, कांदा, द्राक्षे, यांचे लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच विटभट्टी व्यवसायिकांच्या देखील लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तरी त्यांना देखील आपल्या स्तरावर लवकरात लवकर पंचनामा करून मदत मिळावी. तालुक्यातील गोरगरीब शेतकरी यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी,अशा आशयाचे निवेदन आर पी आय आठवले गटाचे खटाव कार्याध्यक्ष गणेश भोसले यांच्या वतीनं देण्यात आले.

    वडूज :  मागील आठवड्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकरी व मेंढपाळ यांच्या नुकसानीचं पंचनामे करून त्यांना तत्काळ मदत करण्यात यावी या विषयीचं लेखी निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गटचे तालुका कार्याध्यक्ष गणेश भोसले यांनी तहसीलदार किरण जमदाडे यांना दिले आहे

    खटाव तालुक्यातील अवकाळी पावसाने हुसेनपुर (लोणी) श्री रामचंद्र चव्हाण यांची येथील शेतात कराराने मेंढरे बसवली होती. रात्रभर अचानक पाऊस आल्यामुळे 40 मेंढ्या गारठुन दगावल्या आहेत तसेच राजापूर येथील सर्जेराव संपत मदने यांच्या बारा मेंढ्या मरण पावल्या आहेत. संबंधित गोरगरीब मेंढपाळ यांना नुकसानीचा त्वरित पंचनामा करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी.

    त्याचप्रमाणे अवकाळी पावसाने गहू, ज्वारी, हरभरा, कांदा, द्राक्षे, यांचे लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच विटभट्टी व्यवसायिकांच्या देखील लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तरी त्यांना देखील आपल्या स्तरावर लवकरात लवकर पंचनामा करून मदत मिळावी. तालुक्यातील गोरगरीब शेतकरी यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी,अशा आशयाचे निवेदन आर पी आय आठवले गटाचे खटाव कार्याध्यक्ष गणेश भोसले यांच्या वतीनं देण्यात आले. यावेळीदत्ता शिंदे, प्रफुल्ल ओव्हाळे, राहुल सरावणे, पोपट सरावणे, बाळू सरावणे, विशाल सरावणे, तुकाराम अवघडे, सचिन सरावणे, उपस्थित होते