शेतक-यांनी यांत्रिकीकरणाव्दारे शेती करावी : आमदार मकरंद पाटील

वाई पंचायत समिती शेजारी उद्योजक व गुंडेवाडीचे माजी सरपंच सचिन पेटकर यांनी सुरू केलेल्या अँग्रीनियर पावर वीडर- दोन चाकी ट्रॅक्टर विक्री व दुरूस्ती केंद्राचे भेटीप्रसंगी आमदार पाटील बोलत होते. ते म्हणाले, सचिन पेटकर यांच्यासारखे अनेक युवा उद्योजक शेती क्षेत्राशी निगडीत नवनवीन व्यवसाय सुरू करून शेतक-यांची सोय करीत आहेत.

    वाई : शेतीमध्ये मजुरांची कमतरता, पावसातील अनियमितता यांमुळे शेतमालाचे नुकसान होऊ नये, यासाठी शेतक-यांनी शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी केले.

    वाई पंचायत समिती शेजारी उद्योजक व गुंडेवाडीचे माजी सरपंच सचिन पेटकर यांनी सुरू केलेल्या अँग्रीनियर पावर वीडर- दोन चाकी ट्रॅक्टर विक्री व दुरूस्ती केंद्राचे भेटीप्रसंगी आमदार पाटील बोलत होते. ते म्हणाले, सचिन पेटकर यांच्यासारखे अनेक युवा उद्योजक शेती क्षेत्राशी निगडीत नवनवीन व्यवसाय सुरू करून शेतक-यांची सोय करीत आहेत. नवनवीन यंत्रे व तंत्रज्ञानामुळे शेती कामांमध्ये सुलभता येत आहे. त्याचा फायदा शेतक-यांनी घ्यावा. सचिन पेटकर यांनी सृष्टी ट्रेडर्सच्या माध्यमांतून अँग्रीनीर कंपनीचे पावर विडर (दोन चाकी ट्रॅक्टर) विक्री व दुरुस्ती चे नवीन दालन सुरू केले आहे. याबाबतची माहिती दिली. नवीन मशिनरीमुळे शेतीची कामे आगदी सहज व स्वस्त दरात होत आहेत. त्यामुळे खेडोपाड्यातील शेतक-यांना त्याचा फायदा होत आहे. पावर विडरमुळे शेतातील रोटर, नांगरणी, फणपाळी, सरी टाकणे, पेरणी करणे, सोयाबीन कटर, फवारणी पंप, पाणी उपसणे, हळद-आले-ऊस पिकांना भर घालणे, हलकी वाहतूक अशी अनेक कामे केली जात आहेत. ह्या मशीन्स वापरण्यासाठी सुरक्षित असून सर्व अद्यावत यंत्रणा आहे. तसेच मशीनला शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध आहे, जास्तीत-जास्त शेतक-यांनी याचा फायदा घ्यावा, असे आवाहन सचिन पेटकर यांनी केले. अमोल पवार यांनी स्वागत केले.