निकृष्ठ दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करा; रयत क्रांती संघटनेची मागणी

म्हसवड नगरपरिषद हद्दीतील विरकरवाडी याठिकाणी पालिकेच्या वतीने अंतर्गत रस्त्यांचे सिमेट काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. या रस्त्याचे काँक्रीटीकरण हे अत्यंत निकृष्ठ दर्जाचे झाले आहे. असे असताना पालिकेने अत्यंत घाईगडबडीने संबंधित ठेकेदाराचे बिले काढून अदा केले. यामध्ये खूप मोठा गोलमाल आहे.

    म्हसवड : म्हसवड नगरपरिषद हद्दीतील विरकरवाडी याठिकाणी पालिकेच्या वतीने अंतर्गत रस्त्यांचे सिमेट काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. या रस्त्याचे काँक्रीटीकरण हे अत्यंत निकृष्ठ दर्जाचे झाले आहे. असे असताना पालिकेने अत्यंत घाईगडबडीने संबंधित ठेकेदाराचे बिले काढून अदा केले. यामध्ये खूप मोठा गोलमाल आहे.

    निकृष्ठ कामाचे बिल काढणाऱ्या पालिकेची चौकशी व्हावी तर संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख विठ्ठल विरकर यांनी करत आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

    या निवेदनात विरकर यांनी म्हटले आहे की, पालिकेने याठिकाणी कामे देताना आपल्या मर्जीतल्या ठेकेदारांना कामे दिल्याने ती कामे निकृष्ठ दर्जाची झालेली आहेत. झालेली कामे ही अंदाजपत्राप्रमाणे झाली नसतानाही त्या कामांची बिले गडबडीने काढली आहेत. पालिकेत सध्या संगनमताने भोंगळ कारभार सुरु असून, या कामांची चौकशी व्हावी व निकृष्ठ दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी आपण बुधवारपासून (दि.१०) म्हसवड पालिकेसमोर आमरण उपोषण सुरु करणार आहे.