अखेर वाफेगांवच्या पोलीस पाटील ज्योती गाडे निलंबित

कारवाईमध्ये पोलीसांनी वाळू, जेसीबी मशीन, मोटार सायकल व महिन्द्रा गाडी जप्त केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय पुजारी हे करत आहेत.

  अकलूज  : अवैध वाळू उपसा करणे व कारवाई करण्यास आलेल्या पोलीसांच्या कामात अङथळा निर्माण केल्याप्रकरणी वाफेगावच्या पोलीस पाटील ज्योती दादासाहेब गाङे यांच्यावर अकलूज पोलीसांमध्ये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्याची न्यायालयीन चौकशी पुर्ण होईपर्यंत ज्योती गाङे यांना निलंबित करण्यात आल्याचा आदेश आज प्रांताधिकारी शमा पवार यांनी काढला आहे.

  दि. ७ मार्च रोजी ज्योती दादासाहेब गाङे, दादासाहेब गाङे किशोर गाङे यांच्यासह आणखी दोघांवर अकलूज पोलीसांमध्ये अवैध वाळू उपसा करणे, पोलीसांना दमदाटी व शिवीगाळ करुन धक्का बुक्की केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्योती गाङे या वाफेगावच्या पोलीस पाटील आहेत तर दादासाहेब गाङे हे मुख्याध्यापक आहेत. ज्योती गाङे यांना पोलीस पाटील पदावरुन हटवण्यात यावे अशी मागणी वाफेगाव ग्रामस्थांनीही केली होती.

  जबाबदार पदावरील व्यक्तीने केलेल्या या कृत्याची दखल घेत आज प्रांताधिकारी शमा पवार यांनी न्यायालयीन चौकशी पुर्ण होईपर्यंत ज्योती गाङे यांना पदावरुन निलंबित करण्यात आल्याचा आदेश काढला आहे.

  अवैधरित्या वाळू उत्खनन सुरू असलेल्या ठिकाणी आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीसांना वाळू पोलीस पाटील, मुख्याध्यापक व वकिल असणाऱ्या व्यक्तींनी दमदाटी केल्याची घटना घडली आहे. मात्र अकलूजच्या दबंग पोलीसांनी सर्वाच्या मुसक्या आवळल्या आहेत.

  याबाबत सविस्तर माहिती अशी की, खवऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून वाफे गाव येथील भीमा नदी पात्रात अवैध वाळू उत्खनना विरोधात कारवाई करण्यासाठी पोलीस निरिक्षक अरुण सुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज पोलीसांची टिम पोहोचली. त्यावेळी जेसीबीच्या सहाय्याने नदी पात्रात वाळू उपसा सुरू होता. पोलीसांना पाहताच जेसीबी ड्रायव्हरने पळ काढला. पोलीस जेसीबी ताब्यात घेऊन निघाले असता, दादासाहेब जगन्नाथ गाडे (मुख्याध्यापक), किशोर दादासाहेब गाडे(वकिल) व ज्योती दादासाहेग गाडे (पोलीस पाटील) सर्वजण रा. वाफे गाव, ता. माळशिरस, जि. सोलापूर यांनी महिन्द्रा टीयुव्ही (एमएच ४५ एजे २७०३) ही गाडी रस्त्यावर आडवी लावून पोलीसांच्या कामात अडथळा निर्माण केला. किशोर गाडे याने पोलीस पाटलाचा जेसीबी घेऊन जाता काय? मी वकिल आहे. तुमच्यावरच केस करतो असे म्हणून पोलीसांना धक्काबुक्की केली.

  हा गोंधळ सुरू झाल्यानंतर कारवाईवर असलेल्या पोलीसांनी अतिरीक्त पोलीस मदत घेण्यासाठी पोलीस निरिक्षक दत्तात्रय पुजारी यांना फोन केला. पो. नि. पुजारी हे पोहेकॉ. रामचंद्र चौधरी, सुहास क्षीरसागर, विकी घाडगे, पो. ना. निलेश काशिद, नितीन लोखंडे, मनोज शिंदे, पो. कॉ. अमितकुमार यादव, चापोकॉ. बारकुंड यांच्यासह तेथे आले. त्यानंतर त्यांनी दमदाटी करणारे दादासाहेब गाडे, किशोर गाडे, पोपट दत्तात्रय इंगळे, माऊली शिवाजी शिंदे यांच्यासह महिन्द्रा गाडी ताब्यात घेतली व सदर व्यक्तींना ताब्यात घेऊन अकलूज पोलीस ठाण्यात आणले. आज सदर व्यक्तींना माळशिरस कोर्टात हजर करण्यात आले आहे. या कारवाईमध्ये पोलीसांनी वाळू, जेसीबी मशीन, मोटार सायकल व महिन्द्रा गाडी जप्त केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय पुजारी हे करत आहेत.