सर्वसामान्य जनतेसाठी उभारलेला के. एम. ऍग्रो प्रकल्प म्हणजे घार्गे यांच्या आयुष्यातील सर्वोच्च स्वप्न : प्रीती घार्गे

  मायणी : दुष्काळी भागातील सर्वसामान्य जनतेसाठी तारळी, उरमोडी, जिहे कटापूर या योजनांचा यशस्वी पाठपुरवठा करून आज येथील सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी के. एम. शुगरची निर्मिती करणे हे कारखान्याचे चेअरमन प्रभाकर घार्गे यांच्या आयुष्यातील सर्वोच्च स्वप्न होते. ते आज पूर्ण झाले असून, राजकारणापलीकडे जाऊन समाजकारण करण्याच्या घार्गे यांच्या कार्यपद्धतीमुळे सर्वसामान्य जनतेसाठी प्रभाकर घार्गे हे व्यक्तिमत्व सदैव आपलेसे वाटत आहे, असे संचालिका प्रीती घार्गे यांनी सांगितले.

  खटाव माण तालुका ऍग्रो प्रो. लि. पडळ या साखर कारखान्यात चेअरमन माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित वृक्षारोपण व रक्तदान शिबीर कार्यक्रमात प्रीती घार्गे बोलत होत्या. यावेळी प्रकाश घार्गे, संचालक विक्रम घोरपडे, उत्तम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना प्रीती घार्गे म्हणाल्या, दुष्काळी भागात कारखाना उभारणी करणे ही एक अशक्य बाब मानली जात असताना भागातील शेतकरी बागायतदार बनला पाहिजे. आर्थिकदृष्टया सक्षम बनला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या भागातून पुणे मुंबई याठिकाणी युवकाची लागलेली रोजगारासाठी रांग थांबली पाहिजे, या ध्यासातून के एम शुगरची निर्मिती प्रभाकर घार्गे यांनी खटाव तालुक्यात केली.

  आज बेरोजगारांना रोजगार मिळाला असून, भागातील शेतकरी आज भागात ऊसाची लागवड वाढत असून कोजन, डिसलरी प्रकल्पांच्या माध्यमातून के. एम. शुगर आणखी प्रगती करेल, असा दृढ विश्वासही घार्गे यांनी व्यक्त केला.

  प्रभाकर घार्गे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खटाव माण ऍग्रो साखर कारखाना येथे आयोजित करण्यात आलेल्या “रक्तदान शिबीरास रक्तदात्यांनी उस्फुर्त प्रतिसाद देताना. ८० रक्तदात्यांनी आपले योगदान दिले. या सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र व कारखान्याच्यावतीने भेटवस्तू देण्यात आली. यास अक्षय ब्लड बँक सातारा यांचे सहकार्य लाभले. याचबरोबर कारखाना प्रांगणात वृक्षारोपण पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपणही करण्यात आले.

  कोरोना काळात चेअरमन प्रभाकर घार्गे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान व वृक्षारोपण या कार्यक्रमांचे आयोजन केल्याने उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक केले.

  चेअरमन माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या वाढदिवसानिमित्त कारखाना संचालक, सर्व विभाग अधिकारी व कर्मचारी यांनी केक कापून कार्यस्थळी वाढदिवस साजरा करण्यात आला.

  यावेळी टेक्निकल डायरेक्टर नरेंद्र साळुंखे, चीफ इंजिनिअर काकासाहेब महाडिक, अजित मोरे, किरण पवार, तात्यासो पांढरे, अमोल पाटील, चीफ केमिस्ट शिंदे यांचेसह विभाग पदाधिकारी, सुपरवायझर, कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन अमोल पाटील यांनी केले तर आभार दत्ता कोळी यांनी मानले.