Vaccination
Vaccination

    सातारा : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत सातारा शहरात उद्यापासून मोफत व रजिस्ट्रेशनशिवाय महालसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात आले. यासाठी 15 ठिकाणी लसीकरण केंद्रे नियोजित करण्यात आली आली असून, या महालसीकरणात साताऱ्यातील 1 लाख 64 हजार 275 एवढय़ा नागरिकांना लस देण्याचे उद्धिष्ट आहे. दरदिवशी प्रत्येक केंद्रावर 600 वर नागरिकांना लस देण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट (Abhijeet Bapat) यांनी दिली.

    सातारा शहरातील लसीकरण 100 टक्के पूर्ण करण्यासाठी अशाप्रकारे महालसीकरणाचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये नगरपालिका ग्रंथालय, सदरबझार, नगरपालिका ऑफिस सदरबझार, नागरी आरोग्य सुविधा केंद्र गोडोली, रविवार पेठ समाजमंदिर, कूपर कॉलनी सांस्कृतिक हॉल, पुष्करणी क्लिनिक, महाजन वाडा मंगळवार पेठ, नगरपालिका मंगल कार्यालय केसरकर पेठ, मेडिटेशन हॉल चिमणुपरा, भवानी हायस्कूल सातारा मल्हारपेठ, श्रीपतराव हायस्कूल करंजे, शनिवार पेठ समाज मंदिर व कस्तुरबा नागरी आरोग्य केंद्र अशा 15 ठिकाणी दररोज 600 च्या नागरिकांना कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन पहिला व दुसरा डोस असे लसीकरण लसींच्या उपलब्धेनुसार करण्यात येणार आहे.

    रजिस्ट्रेशनची गरज नाही

    या 15 लसीकरण केंद्रांवर नागरिकांना कोणतेही रजिस्ट्रेशन न करता मोफत लस देण्यात येणार आहे. त्या-त्या केंद्रांवर आधारकार्डसह जाऊन नागरिकांनी रांगेत उभे राहून व कोरोना नियमांचे पालन करुन लस घ्यावी, असे आवाहन बापट यांनी केले आहे.