
जी. के. गुजर मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने मंगळवार १५ रोजी सकाळी ११ वा. ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व. गंगारामजी केशवराव गुजर तथा भाई यांच्या ३३ व्या पुण्यस्मरण दिनी, डॉ. अशोक गुजर टेक्निकल इन्स्टिट्युटस् डॉ. डॉ. दौलतराव आहेर कॉलेज ऑफ इंजिनिअरींग बनवडीच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे वारसदार व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
कराड : जी. के. गुजर मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने मंगळवार १५ रोजी सकाळी ११ वा. ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व. गंगारामजी केशवराव गुजर तथा भाई यांच्या ३३ व्या पुण्यस्मरण दिनी, डॉ. अशोक गुजर टेक्निकल इन्स्टिट्युटस् डॉ. डॉ. दौलतराव आहेर कॉलेज ऑफ इंजिनिअरींग बनवडीच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे वारसदार व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
या वर्षी २०२१वे स्वातंत्र्य सेनानी भाई गुजर पुरस्कार स्वातंत्र्य सेनानी वारसदार श्रीमती वेणूबाई हरि रसाळ रा. म्हसवड, कैलास ज्ञानेश्वर जूरकर रा. ठाणे (समाजकार्य), सौ. शकुंतला विठ्ठल माने रा. मालखेड (उत्कृष्ठ सरपंच) व २०२२ वे पुरस्कार स्वातंत्र्य सेनानी वारसदार गन्नाथ मारुती लोखंडे रा. कोरेगांव, सौ. सिमा विनोद लोकरे मुंबई (समाजकार्य), व मधुकर रावजी गिलबिले (गुरुजी) रा. राजगुरुनगर खेड (शिक्षण व समाजकार्य) यांना जाहीर झाला आहे.
महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते, ट्रस्टचे चेअरमन डॉ. अशोकराव गुजर यांच्या अध्यक्षतेखाली व कांतिसिंह नाना पाटील गौरव समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष बाबाराव विठोबा मुठाळ आणि कार्याध्यक्ष संपतराव जाधव, आदर्की यांच्या प्रमुख उपस्थिीतीत पुरस्कारने सन्मानित करण्यात येणार आहे.
सदर समारंभासाठी स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे वारसदार व नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जी. के. गुजर ट्रस्टचे उपाध्यक्ष इंद्रजीत गुजर व सचिव डॉ. माधुरी गुजर व समस्त गुजर कुटुंबिय यांच्यावतीने करण्यात आले आहे.