शेळी पालन व्यवसायास चांगले दिवस :  डॉ.विलास आहेर

शिरवळ ( ता. खंडाळा )येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय शेळीपालन प्रशिक्षणाच्या समारोपाच्यावेळी डॉ. आहेर बोलत होते.याप्रसंगी ५० यशस्वी प्रशिणाथीॅना मान्यवरांचे हस्ते प्रमाणपत्र व शेळीपालन मार्गदर्शक पुस्तिकेचे वितरण करण्यात आले.

    खंडाळा : शेळी पालन हा केवळ शेतीपूरक जोडधंदा राहिला नाही,तर त्याचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण होत असून या व्यवसायास चांगले दिवस आले असल्याचे मत पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.विलास आहेर यांनी व्यक्त केले.

    शिरवळ ( ता. खंडाळा )येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय शेळीपालन प्रशिक्षणाच्या समारोपाच्यावेळी डॉ. आहेर बोलत होते.याप्रसंगी ५० यशस्वी प्रशिणाथीॅना मान्यवरांचे हस्ते प्रमाणपत्र व शेळीपालन मार्गदर्शक पुस्तिकेचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रमुखपाहुणे म्हणून प्रभारी तालुका कृषी अधिकारी राजेश कुलकणीॅ, महाविद्यालयातील पशुव्यवस्थापन विभागप्रमुख डॉ.अजय खानविलकर, पशुचिकित्सा औषधी शास्त्र विभागप्रमुख डाॅ.बालाजी अंभोरे,कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे समिर चव्हाण व सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री.सागर ढावरे उपस्थित होते.प्रा. डॉ.साईनाथ भोकरे यांनी सूत्रसंचालन केले.तर विस्तार विभागप्रमुख डॉ. स्मिता कोल्हे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.