लग्नसोहळात एक लाख रुपयांची पुस्तके भेट देताना शिक्षक जयवंत तांबे व नुतन वधू-वर (छाया-निनाद जगताप, सातारा)
लग्नसोहळात एक लाख रुपयांची पुस्तके भेट देताना शिक्षक जयवंत तांबे व नुतन वधू-वर (छाया-निनाद जगताप, सातारा)

सध्या अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी समाज झटत असताना विविध मराठी वहिनी मधून अंधश्रद्धा पसविणाऱ्या मालिकेचा अवकाळी पाऊस पडत आहे. त्यावर मात करण्यासाठी पुस्तके बचाव करू शकतात. हे पुन्हा एकदा सिध्द करून दाखविले आहे. मुलींचा संसार सुखाचा व्हावा ही इच्छा पूर्ण करायची असेल तर मोबाईल, दूरदर्शन संच, यंत्रसामग्री देण्यापेक्षा पुस्तके भेट देण्याची घेतलेली भूमिका कौतुकास पात्र ठरली आहे.

    सातारा : लग्नसोहळा म्हणजे आनंदाचा क्षण तसेच कन्येचा माहेर ते सासरी प्रवासाचा प्रसंग, याचा सोहळ्यात फलटणमध्ये लाख मोलाची पुस्तके भेट देऊन वडिलांनी कन्या दानासोबत ज्ञानदानांसाठी पुढाकार घेतला आहे.
    याबाबत माहिती अशी की, फलटण तालुक्यातील जिंती येथील शिक्षक जयवंत तांबे यांनी कन्या संजूश्री व चिरंजीव सचिन रघुनाथ कोळपे यांचा लग्नसोहळा आयोजित केला होता. यावेळी आवश्यक बाबींची पूर्तता तसेच अंधश्रद्धेला फाटा देऊन ज्ञान देणाऱ्या पुस्तके खरेदी करून ती कन्येला भेट देण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे संस्कार मिळणार असून सर्वानाच वाचनाची गोडी निर्माण होणार आहे.

    अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित झाले असताना खऱ्या अर्थाने वाचन संस्कृती जतन करण्याचे काम शिक्षक तांबे यांनी करून सुशिक्षित वर्गाच्या डोळ्यात अंजन घातले आहे. युगप्रवर्तक व बुद्धीच्या जोरावर हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज, शिक्षणमाता सावित्रीबाई फुले, कर्मयोगीनी अहिल्याबाई होळकर, घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर, स्वतंत्र वीर वि. दा. सावरकर, आनंदीबाई जोशी यांच्या विचारांची देवाणघेवाण होण्यासाठी चरित्र तसेच त्यांच्या विचारांची पुस्तके उपलब्ध केली आहेत, या साठी कपाट सुध्दा खरेदी करून दिले आहे.

    सध्या अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी समाज झटत असताना विविध मराठी वहिनी मधून अंधश्रद्धा पसविणाऱ्या मालिकेचा अवकाळी पाऊस पडत आहे. त्यावर मात करण्यासाठी पुस्तके बचाव करू शकतात. हे पुन्हा एकदा सिध्द करून दाखविले आहे. मुलींचा संसार सुखाचा व्हावा ही इच्छा पूर्ण करायची असेल तर मोबाईल, दूरदर्शन संच, यंत्रसामग्री देण्यापेक्षा पुस्तके भेट देण्याची घेतलेली भूमिका कौतुकास पात्र ठरली आहे. यापुढे शुभ कार्य व लग्नसराईत पाहुणे व मान्यवरांचे भेट वस्तू, शाल-श्रीफळ स्वागत करण्यापेक्षा त्यांना ग्रँथ भेट दयावेत किंवा त्यांची आरोग्य तपासणी करावी अशी अपेक्षा समाज माध्यमातून होत असल्याची माहिती ग्रँथप्रेमी व साहित्यिक यांनी दिली आहे.