साताऱ्यात गृहराज्यमंत्री देसाई, शिंदेंचा पराभव! बँकेवर राष्ट्रवादीची सत्ता आली असली तरी ईश्वर चिठ्ठीद्वारे दोन विरोधकांचा बँकेत प्रवेश

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यामध्ये अनेक धक्कादायक घडामोडी घडल्या. बँकेवर राष्ट्रवादीची जरी सत्ता आली असली तरी ईश्वर चिठ्ठीद्वारे दोन विरोधकांनी बँकेत प्रवेश केला. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला(Home Minister Desai, Shinde defeated in Satara! Although the NCP came to power in the bank).

    सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यामध्ये अनेक धक्कादायक घडामोडी घडल्या. बँकेवर राष्ट्रवादीची जरी सत्ता आली असली तरी ईश्वर चिठ्ठीद्वारे दोन विरोधकांनी बँकेत प्रवेश केला. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला(Home Minister Desai, Shinde defeated in Satara! Although the NCP came to power in the bank).

    खटाव सोसायटीतून राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेले प्रभाकर घार्गे यांनी पक्षाचे उमेदवार नंदकुमार मोरे यांचा पराभव केला.

    सातारा जिल्हा बँकेच्या निवडणूक निकालानंतर आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेत आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर जाहीर टीका केली आहे.

    जावली तालुक्यांमध्ये करत असलेल्या ढवळाढवळ यामुळेच आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव झालेल्या बोलत त्यांना आता आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे अशी बोचरी टीका केली आहे.