जिल्हा रुग्णालय परिसरात मानवी कवटी आढळल्याने खळबळ

जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात काही दिवसांपूर्वी पोस्ट मार्टम रूममधील मानवी अवशेषाचे लचके भटक्या कुत्र्यांकडून तोडण्याची घटना घडली होती. बुधवारी सकाळी कॅन्टीनच्या पाठीमागे मानवी कवटी (Human Skull) आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

    सातारा : जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात काही दिवसांपूर्वी पोस्ट मार्टम रूममधील मानवी अवशेषाचे लचके भटक्या कुत्र्यांकडून तोडण्याची घटना घडली होती. बुधवारी सकाळी कॅन्टीनच्या पाठीमागे मानवी कवटी (Human Skull) आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

    काही दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयाच्या पोस्ट मार्टम रूममधील मानवी अवषेशाचे लचके भटक्या कुत्र्यांकडून तोडण्याची घटना समोर आली होती. यावरून येथील रुग्णालय प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर आला होता. त्यातच बुधवारी सकाळी कॅन्टीनच्या पलीकडील बाजूस मानवी कवटी सापडल्याने एकच खळबळ उडाली.

    याबाबत जिल्हा रुग्णालय प्रशासनास माहिती कळताच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास कदम, डॉ. राहुल खाडे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तर गेल्या दोन महिन्यात डीएनए किंवा शरीराचा अवयव तपासणी आला नाही. परंतु, मानवी कवटी आढळली असून त्याचा शोध घेण्यात येईल. जिल्हा रुग्णालयात असलेले शवागृह हे पूर्ण बंदिस्त आहे. त्यामुळे या घटनेचा शोध घेऊन दोषी असणाऱ्यावर कारवाई केली जाणार असल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.